माँ चोंडेश्वरी देवी मंदिरात नवरात्र उत्सव साध्या पध्दतीने

तालुका प्रतिनिधी मोहाडी : विदर्भाच्या पूर्व टोकावर असलेल्या भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथील सुप्रसिद्ध जागृत माता चौंडेश्वरी देवी मंदिरात यावर्षी कोरोनाकाळ सुरू असल्याने अगदी साध्या पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. मागील वर्षी नवरात्र उत्सवात सर्वसाधारण १ हजार ५०६ व आजीवन १३१ असे एकूण १ हजार ६३७ नोंदणी करण्यात आली होती. यावर्षी घटनोंदणी ५५१ रुपये असून घटस्थापना करण्यात येणार असून घटधारकांना मंदिर परिसरात प्रवेश करिता येणार नाही. सर्व सोपस्कार नियमाचे आधीन राहून मंदिर कमिटीचे पदाधिकारी पार पाडणार असल्याचे श्री चौडेश्वरी माता मंदिर कमिटी मोहाडीचे अध्यक्ष व शारदीय नवरात्र उत्सव समितीचे अध्यक्ष प्रेमरतन दमानी यांनी दैनिक भंडारा पत्रिकेला सांगितले. अधिक माहितीसाठी शोभाराम प्रभूदास मलेवार भ्रमणध्वनी ९८९०९३११०६ व ग्यानदेव पराते,मोहाडी भ्रमणध्वनी ९९२३३८११२३ यांच्याकडे शुक्रवार दि.१६ आॅक्टोबर २०२० पर्यंत संपर्क साधावा.

कोरोना संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा नवरात्रौत्सव, दुर्गा पूजा व विजयादशमी साध्या पध्दतीने साजरा करण्याबाबत सोमवार दि.२९ सप्टेंबर २०२० च्या शासन निर्णयान्वये मागदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. या सूचनांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य आहे. सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मंडळांनी मोहाडी नगरपंचायत व तालुक्यातील ७७ ग्रामपंचायत, स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पुर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोविड-१९ मुळे उदभलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता तसेच न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश मोहाडी नगरपंचायत, स्थानिक प्रशास नाचे मंडपांबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. या वर्षीचा नवरात्रौत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मुर्तीची सजावट त्यानुषंगाने करण्यात यावी.

देवीच्या मुतीर्ची उंची सार्वजनिक मंडळांकरीता ४ फुट व घरगुती देवीच्या मुर्तीची उंची २ फुटांच्या मर्यादेत असावी. यावर्षी शक्यतो पारपारीक देवीच्या मुतीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे. मुर्ती शाडूची, पर्यावरण पूरक असल्यास तीचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यासंदर्भात प्रशासनाशी समन्वय ठेवावा. नवरात्रौत्सवाकरीता वर्गणी, देणगी स्वच्छेने दिल्यास स्विकार करावा. जा-ि हरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. तसेच माझे कुटुंब- माझी जबाबदारी या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी.गरबा,दांडिया व इतर सांसकृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, रक्तदान शिबीर आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना,मलेरिया, डेंग्यु इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय,स्वच्छता याबाबत जनजागृती करावी. आरती, भजन, किर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. ध्वनी प्रदुषणासंदभार्तील नियमांचे व तरतुदींचे पालन करण्यात यावे. देवीच्या दर्शनाची सुविधा आॅनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. देवीच्या मंडपांमध्ये निजंतुर्कीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनींगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाºया भाविकांसाठी शारीरीक अंतर तसेच स्वच्छतेचे नियम पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येवू नयेत. विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरीष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी. स्थानिक प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी स्विकृती केंद्रांची व्यवस्था करावी. मंडपात ५ पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी आणि खाद्यपदार्थ अथवा पेय पानाची व्यवस्था करण्यास मनाई असेल. सार्वजनिक नवरात्रौत्सव प्रतिबंधीत क्षेत्रात असल्यास तर मुर्ती विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करण्यास मनाई आहे. दसºयाच्या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून प्रतिकात्मक स्वरुपाचा असावा. आवश्यक तेवढे व्यक्तीच कार्यक्रम स्थळी हजर राहतील. फेसबुक व इतर समाज माध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे बघण्याची व्यवस्था करावी. देवीची मुर्ती तलाव, नदीमध्ये विसर्जन करण्यात येवू नये. शासनाने दिलेल्या सुचनांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहील. नागरिकांनी सूचनांचे पालन करुन प्रशास नास सहकार्य करावे असे आवाहन मोहाडी नगरपंचायतचे मुख्यधिकारी रामेश्वर पांडागळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *