८ गोवंशांची सुटका

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : तालुक्यातील चंगेरा ते बाजारटोला मार्गावर नाकाबंदी करुन रावणवाडी पोलिसांनी २५ सप्टेंबर रोजी कत्तलखान्याकडे जाणाºया ८ गोवंशांची सुटका केली. याप्रकरणी गोवंश, चारचाकी वाहन असा ९ लाख ६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली रावणवाडी पोलिस जनावरांची अवैधरित्या वाहतूक करणाºया विरुध्द विशेष धाड मोहिम राबविण्यात येत आहे.

यातंर्गत २५ सप्टेंबर रोजी ठाणेदार पुरुषोत्तम अहेरकर यांना चंगेरा येथून चारचाकी वाहनाने अवैधरित्या जनावरे कत्तलीकरीता नागपूर नेत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी चंगेरा ते बाजारटोला मार्गावर नाकाबंदी केली. दरम्यान एमएच ३६, ३१३४ पाहणी केली असता त्यात ८ गोवंश कत्तलीकरिता निर्दयतेने, चाºया, पाण्या विना कोंबून बंदिस्त केलेली आढळली. पोलिसांनी गोवंशीय जनावरे सुरक्षेच्या दृष्टीने व त्यांच्या चारापाण्याची व्यवस्था व्हावी याकरीता कोरणी येथील गौशाळेत दाखल केले असून वाहन जप्त केले. याप्रकरणी इमरान रहेमान शेख (३०) व शुभान सलाम खान (४८) दोन्ही रा. चंगेरा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.