जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी स्वच्छतागृह व अन्य सोयींची मागणी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा या मोठ्या रुग्णसंख्या असलेल्या या रुग्णालयात नातेवाईकांसाठी व महिलांसाठी स्वच्छतागृह व अन्य सोयी नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. या महत्त्वाच्या समस्येच्या निराकरणासाठी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांना अन्यायग्रस्त शेतकरी संघटनेच्या वतीने नुकतेच निवेदन देण्यात आले.या निवेदनानुसार जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा जिल्ह्यातील व मध्यप्रदेश छत्तीसगड येथून हजारो रुग्ण दररोज उपचारासाठी येतात. गंभीर रुग्णांना सामान्य रुग्णालय भंडारा येथे भरती करण्यात येते. या रुग्णांसोबत राहणाºयां नातेवाईकांसाठी स्वच्छतागृह तसेच अन्य कोणत्याही सोयी उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुणासोबत असणाºयांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते . पुरुष मंडळी जिथे जागा मिळेल राहतात व कुठेही लघुशंका करून आपली वेळ मारुन नेतात. परंतु महिलांना मात्र याचा मोठा त्रास होतो रुग्णांसोबत राहणाºयांसाठी ताबडतोब स्वच्छतागृह बांधण्यात यावे व अन्यसोयी करण्यात याव्या अशी मागणी अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, विष्णुदास लोणारे, कोठीराम पवनकर ,पुरुषोत्तम गायधने ,नितेश बोरकर ,बंडू ढेंगे, रामेश्वर भेदे, राजकुमार भोपे, विकास निंबार्ते तसेच अनेक कार्यकर्त्यांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.