हॉटेल्स, फुट कोर्ट, रेस्टारंट व बार सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत सुरू राहणार

प्रतिनिधी गोंदिया :-कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा लागू असून त्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले होते. सदर आदेशात हॉटेल्स, फुट कोर्ट, रेस्टारंट व बार ५० टक्के क्षमतेसह सुरु ठेवणेबाबतची परवानगी देण्यात आली होती. सदरच्या आस्थापना चालविण्यासाठी एसओपी पर्यटन विभागाकडून निर्गमित करण्यात येईल असे आदेशात उल्लेख करण्यात आला होता. आता पर्यटन विभागाकडून मार्गदर्शक सूचनेची एसओपी निर्गमित करण्यात आली असून हॉटेल्स, फुट कोर्ट, रेस्टारंट व बार या आस्थापनांची वेळ सकाळी ८ ते १० पर्यंत राहणार आहे. या मार्गदर्शक सूचनेची अंमलबजावणी करणे बंधनका- रक राहील. बार संचालित करण्यासाठी व कामाच्या वेळेकरीता आबकारी विभागातर्फे स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येणार असल्याचे जिल्हा धिकारी दीपक कुमार मिना यांनी कळविले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *