मोदींजींच्या जीवन चरित्रातून कार्यकर्त्यांनी प्रेरणा घ्यावी- माजी खा.शिशुपाल पटले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : भारताचे लाडके प्रधानमंत्री मा. नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त भारतीय जनता पार्टी च्या वतीने सेवा पांढरवाडा हे कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ह्या कार्यक्रमा अंतर्गत मोदींजीच्या जीवनावर प्रदर्शनीचे आयोजन भारतीय जनता पार्टी तुमसर शहर च्या वतीने तुमसर कार्यालयामध्ये नुकताच ठेवण्यात आला होता. यावेळी प्रदर्शनीचे उद्घाटन माजी खासदार शिशुपाल पटले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुमसर विधानसभा क्षेत्राचे प्रमुख प्रदीपजी पडोळे होते.

देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांचा जीवनातील प्रवास संघर्षमय असल्याने आपण सर्व कार्यकर्त्यांनी त्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे. जीवनात यशस्वी होण्यासाठी मोदीजींचे जीवनचरित्र सर्व कार्यकर्त्यांनी जाणून घेण्याचे आव्हान माजी खासदार शिशुपाल पटले यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणातून केले. कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळण्यासाठी ह्या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी यावेळी तुमसर शहराध्यक्ष पंकज बालपांडे, महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष सौ.गीता कोंडेवार, जिल्हा महामंत्री सौ.कुंर्दा वैद्य, शहर महामंत्री योगेश रंगवानी, युवा मोर्चा अध्यक्ष पवनजी पाटिल महिला मोर्चा शहर अध्यक्ष सौ. प्रिती मलेवार व्यापारी आघाडी चे अन्नू रोचवानी, महिला आघाडी शहर महामंत्री आदिती काळबांडे, भाजपा शहर सचिव चरण ठाकरे, महामंत्री सौ.मनिषा उपध्याय, पल्लवी पाटील तसेच युवा मोर्चा महामंत्री अनुज मलेवार, महामंत्री शुभम मिश्रा, गौरव किटे, उपाध्यक्ष नितीन धांडे, युवा व्हारीअर्स संयोजक नयन मोहबे, सुशील मेश्राम, शैलेश भाऊ मेश्राम व इतर कार्यकर्त उपस्थित होते

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.