पक्षान सधी दिल्यास वधतन लोकसभा लढणार – खा. सपिया सळ

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी वर्धा : मागील दहा-बारा वर्षांपासून विनोबा भावे आणि महात्मा गांधी यांच्या पावन भूमीत मी दरवर्षी एकदातरी भेट देत असते. येथूनच मार्गदर्शन घेऊन पुढे कामाला लागते. पक्षाने संधी दिल्यास लोकसभा निवडणूक वधेर्तून लढणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. खासदार सुप्रिया सुळे आज सोमवार २ रोजी वर्धेत आल्या होत्या. सकाळी पवनार आश्रम, बापूकुटीला भेट देऊन त्यानंतर प्रतिष्ठीत लोकांच्या भेटीगाठी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीला उपस्थित होत्या. सायंकाळी स्थानिक विश्राम गृहात पत्रकार परिषदेत बोलत होत्या. . खा. सुळे म्हणाल्या की, राज्यातील ट्रिपल इंजिन सरकार असंवेदनशील आहे. त्यांना शेतकºयांच्या, सुशिक्षित बेरोजगार आणि राज्यातील नागरिकांच्या व्यथा दिसत नाही. सत्ता ही फक्त स्वत:च्या स्वार्थासाठी असून सरकार स्वत:पुरते चालवायचं, एवढच माहित आहे. कुणाच्या मागे ईडी लावायची, कुणाच्या मागे सीबीआय लावायची, कुणाचं घर फोडायचं यातच हे सरकार व्यस्त आहे. भाजपाचे मंत्री दुसºया राज्यात प्रचारासाठी जातात मात्र, इथल्या सुशिक्षित बेरोजगारांच्या समस्या ऐकूण घेण्यासाठी वेळ नाही.

मागील काही दिवसांपासून वर्धेत गांधी चौकात बसलेल्या युवकांच्या आंदोलनाला जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी किमान भेट द्यावी, अशी अपेक्षा आमचीही होती. मात्र, शासकीय कार्यक्रम आटोपून समोरच्या दिशेने निघून गेल्याची खंत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. अतिवृष्टीमुळे आज शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले आहे. सोयाबीन आणि कापूस पीक हातून गेल्यागत आहे. याचा आढावा माजीमंत्री अनिल देशमुख यांनी घेतला. देशभरात शेतकºयांची हिच स्थिती आहे. मात्र, या सरकारला या समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे सध्या राज्य हे भगवान भरोसेच चालले आहे. त्यामुळे मी या सरकारचा जाहीर निषेध करीत असल्याचेही खा. सुळे म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस फुटलेली नाही. संघटनेच्या आणि काही कार्यकर्त्यांच्या भरवश्यावर निघून गेल्याचे त्यांनी सांगितले. सध्या शेतकरी मेटाकुटीस आला आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीन आणि कापूस हातचे गेले. त्यामुळे सोयाबीनला ७ हजार आणि कापसाला १२ हजार रुपये भाव द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. पत्रकार परिषदेला माजी मंत्री अनिल देशमुख, माजी आमदार सुरेश देशमुख आदींसह राकाँचे पदाधिकारी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.