कोरोना; राज्यात २ लाख ८२ हजार गुन्हे

प्रतिनिधी मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ८२ हजार गुन्हे,तसेच १३४७ वाहनांवर अवैध वाहतूकीचे गुन्हे दाखल झाले तर ३१ कोटी ४८ लाख रुपयांची दंड आकारणी करण्यात आली. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात दि.२२ मार्च ते १४ आँक्टोंबर पर्यंत कलम १८८ नुसार २,८२,५२३ गुन्हे नोंद झाले असून ४१,२९१ व्यक्तींना अटक करण्यात आली.९६,५८३ वाहने जप्त केली. यातील विविध गुन्ह्यांसाठी ३१ कोटी ४८ लाख ७५ हजार ४८२ रु. दंड आकारण्यात आला. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक का- रवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या ३७४ घटना घडल्या. त्यात ९०० व्यक्तींना, ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *