लॉन्ड्री दुकानाला आग:दिड लाखाचे नुकसान ■ आर्थिक मदतीची मागणी

प्रतिनिधी भंडारा :- खोकरला येथील खात रोड केशव नगर लगतच्या आर्या लॉन्ड्री सेंटरला अचानक आग लागल्याने त्यात ग्राहकाच्या कपड्यांसह अनेक साहित्य जळून खाक झाल्याची घटना बुधवार दिनांक १४ आक्टोंबरला रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास घडली. सविस्तर वृत्त असे की, भंडारा शहरातील संताजी वार्ड येथील रहिवासी प्रवीण क्षीरसागर यांचे गेल्या अनेक वषार्पासून खात रोड खोकरला परिसरात आर्या लॉन्ड्री सेंटर आहे. प्रवीण व कुमोद हे सुखी संसाराचे स्वप्नं पाहत असतानाच अचानक प्रवीणला कर्करोग झाल्याने उपचारादरम्यान त्याच्या मृत्यू ५ महिण्या पूर्वी झाला. दु:खाचे डोंगर कोसळल्याने संपूर्ण कुटुंबाचे पालन पोषण करण्याची जबाबदारी कुमोदवर आली . त्यांना दोन मुली आहेत.

एक मुलगी ६ वषार्ची व दुसरी मुलगी ४ वषार्ची असल्याने त्यांचे पालन पोषण करणे कठीण झाले होते. अशातच कुमोदने डोक्यावरील पदर कंबरेला खोसुन प्रवीणची दुकान हातात घेतली व आलेल्या पैशातून कुटुंबाचे पालन पोषण करणे सुरू होते. लॉकडाऊ नच्या काळात लॉन्ड्री व्यवसाय कमी होत होता मात्र स्थितिलता कमी होताच पुन्हा व्यवसाय भरभराटी लागला . त्यामुळे कपड्यांची अतोनात गर्दी व्हायची अशातच बुधवार दिनांक १४ आॅक्टोंबरला सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास लॉन्ड्री दुकान बंद करून कुमोद ही घरी गेली. घरातील काम करत असतानाच अचानक फोन वाजला त्यातच तिने दुकान जळलेल्याची घटना कळताच हातातील कामे बाजूला सारून दुकानाकडे परत गेले असता दुकानाला आग लागल्याने गर्दीच गर्दी होती . त्यातच आजूबाजूच्या नागरिकांनी अग्निशामक दल व पोलीस प्रशासनाला प्रचारण केले होते.

काही वेळात घटनास्थळी अग्निशामक दलाच्या वाहनाच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश आले. मात्र दुकानात प्रेस करून ठेवलेले व उर्व-ि रत पाचशे ते सहाशे नागरिकाच्या कपड्यासह दुकानातील टेबल, इलेक्ट्रिक साहित्य, जीवन विमा पॉलिसी, महत्वाचे कागदपत्रे जळून खाक झालेले आहेत. त्यात कुमोदचे एक ते दीड लाखाचे नुकसान झाले आहे. त्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी माजी पंचायत समिती सभापती नरेंद्र झंझाड सह नागरिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *