आजपासून श्री भवानी माता शक्ती मंदिरात नवरात्र महोत्सव

यशवंत थोटे मोहाडी : तालुक्याच्या पश्चिम दिशेला मौदा तालुका लागून असून नागपूर जिल्हा आहे.नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील अरोली पोलीस स्टेशनअंतर्गत १ हजार २०० लोकवस्तीचे देवमुंढरी गाव आहे़.खात रेल्वेस्टेशनपासून दोन किमी अंतरावर आहे.देवमुंढरी येथे श्री भवानी माता शक्तीमंदिर आहे़.श्री भवानी म् ा ा त् ा े च् य् ा ा मंदिरात तीन देवीच्या मुर्ती आहेत.माँ काली, महालक्ष्मी आणि मॉ महासरस्वती़, माँकाली ही शक्ती आणि शौर्याचे गुण देणारी,तर महालक्ष्मी ही सुख समृद्धी देणारी आणि महास-रस्वती ही बुद्धी व कलागुणदेणारी देवीआहे़ व र ी ल् ा सर्व गुणांच्या प्राप्तीसाठी भवानी मातेची मनापासून पुजा केल्यास वरील सर्व ुणांची सहज प्राप्ती होते.या भवानी मातेची किर्ती दूर दूर पसरली असल्यामुळे आता पवित्र तिर्थक्षेत्र म्हणून शासन दरबारी मान्यता मिळाली आहे. देवमुंढरी हे गाव नागपूर जिल्ह्याच्या मौदा तालुक्यात येत असून खात रेल्वे स्टेशनच्या उत्तरेला १ किमी अंतरावर आहे.

श्री भवानी मातेच्या जिवनात ज्या काही घडामोडी घडल्या त्याचा संक्षिप्त इतिहास पुढीलप्रमाणे वर्णन करण्यात येत आहे.प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे असे कळले की मोहाडी तालुक्यातील सितेपार हे गाव घनदाट जंगलात होते.या गावात बसुरामला काशिबाई नावाची एकुलती एक मुलगी होती.तिचा जन्म १७९३ ला याच गावी झाला.हसीराम व त्याचा मित्र होकटूजी मोलमजुरी करण्याक-ि रता सितेपारला आले.हसिराम याला मुलगी झाली तिचे नाव गंगाबाई होते. होकटू याला एक मुलगा व मुली असे दोन अपत्त्य झाले.मुलाचे नाव सागर व मुलीचे नाव जमुनाबाई होते.गंगाबाई व जमुनाबाईचा ज न् म् ा १ ७ ९ ५ ला झाला तर सागरचा जन्म १७९७ ला झाला. काशी,गंगा,जमुना आणि सागर हे चौघे जण नेहमीच एकोप्याने राहून खेळत असत़य् ा ा च् ा सितेपार गावात १८०४ मध्ये एक घटना घडली़.या तिन्ही मेत्रीणी खेळता खेळता जंगलात दूरवर निघून गेल्या.त्यांच्या मागे जमुनाचा लहान भाऊ सागरसुद्धा होता.वाघाने सागरवर झडप घेऊन त्याला ठार केले व त्याचे रक्तपिऊन वाघ निघून गेला.

आपण खेळता खेळता घनदाट जंगलात आलो हे तिन्हीच्या लक्षातआल्यावर ते परत गावाकडे येत असताना त्यांना सागरचा मृतदेह दिसला़ सागरची अशी अवस्था पाहून तिघीही रडू लागल्या व रडत रडत गावाकडे निघाल्या़ थोड्या अंतरावर यांना वाघ दिसला.त्या पुन्हा जंगलात गेल्या़ जंगलात एक विहिर होती.विहिरीचे पाणी पिऊन त्या झोपल्या.पळून पळून थकल्यामुळे त्यांना गाढ झोप लागली.रात्री तोच वाघ पुन्हा विहिरीजवळ आला.तिघींना मृत समजून विहिरीत फेकले.तिन्ही मुली व सागर रात्री घरी आले नाही तेव्हा आई-वडिलांनी गावात विचारपुस केली व अन्य लोकांनी जंगलात शोध घेतला पण त्यांचा शोध लागला नाही. काही दिवसांनी एक व्यक्ती लाकडे तोडण्याकरिता जंगलात गेला तेव्हा त्याला सागरचा हाडांचा सांगडा दिसला. काही अंतरावर त्याला विहिर दिसली.त्याला वि-ि हरीत तिन फुलं दिसली.हा चमत्कार गावातील लोकांना सांगितला.तेव्हा बसुराम, हासीराम व होकटू जंगलाच्या विहिरीजवळ जाताच कडू निंबाच्या झाडाखाली वाघ बसलेला दिसला.हे तिघेही झाडाच्या आडोश्याला उभे राहिले.

काहीवेळानंतर वाघ निघून गेला.तेव्हा तिघेही विहिरीजवळ गेले.त्यांना सुद्धा िव िह र ी च् य् ा ा पाण्यात तिच फुले दिसली.आपल्या मुली व मुलगा गेल्यामुळे ते शोक करू लागले व आपल्या वेदना लोकांना सांगू लागले.काही दिवसांनी तिन्ही मुली आपापल्या आई-वडिलांच्या स्वप्नात गेल्या व संपूर्ण वृत्तांत सांगितला.आई-वडिलांची समजूत घालून आम्ही तिघेही जिवंत असून आमचे वास्तव्य तलावाच्या पाळीवर असलेल्या बांबूच्या वनात आहे. आम्ही मजेत असून आमची काळजी करू नये असेही त्या म्हणाल्या…सरते शेवटी बसुराम, हरिराम,होकटू व गावकरी मंडळ तिघींच्या शोधात जंगलातील तलावाच्या काठी आले.आम्ही इथेच आहोत,असा ध्वनी लोकांनी ऐकला,गावकरी बांबूच्या झुडपाजवळ गेले व त्याला तोडू लागले.बांबू तोडत असताना एका ठिकाणी एका रांगेत तीन जागी रक्ताची धार वाहतांना दिसली.थोड्यावेळानंतर तेथे तीन कोंब फुटली.तुम्ही आमची सेवा करा,आम्ही तुमचे कल्याण करू, असा लोकांनी आवाज ऐकला तेव्हापासून या जागेला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

या जागेला देवमुंढरी या नावाने ओळखले जाते.भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर या जंगलात किन्ही हे गाव आहे़.यागावावरू न श्री वडगुजी व त्यांच्या पत्नी चिमनाबाई शेती,मोलमजुरीकरीता देवमुंढरी येथील पाचघरे कुटुंबाकडे आले.देवमुंढरी भागात पोट भरणे शक्य नसल्यामुळे तेवढ्यात जाण्याकरिता निघाले.मॉ भवानीने चिमनाबाईला साक्षात्कार दिला.तेव्हापासून चिमनाबाई नित्यनेमाने देवीची पुजा करू लागली.इतर भाविकांच्या सहकायार्ने रेतीमातीचे देऊळ बांधण्यात आले़.भवानी मातेच्या मुतीर्ची प्राणप्रतिष्ठा सन१८१० च्या सुमारास झाली असावी.सुरूवातीला चिमनाबाईने ३० वर्ष भवानीमातेची सेवा केली. चिमनाबाईचा मुलगा राधोयाने ३५ वर्ष भवानी मातेची सेवा केली.राघोचा मुलगा तुकाराम यानी ५१ वर्ष मातेची सेवा केली.

कुही तालुक्याच्या माळणी गावातूनआलेले श्री कान्हूजी यांनी २१ वर्षे सेवा केली व देवळातच त्यांना मृत्यू आला. कान्हूजी यांनी मरणापूर्वी विठोबाजी यांना मातेची सेवा करावयास सांगितले, विठोबाजींनी २९ वर्ष मातेची सेवा केली. विठोबाजीच्या मृत्यूपर्यंत त्यांच्या पत्नी सखूबाईने १० वर्ष सेवा केली व त्या मरण पावल्या.सखूबाईचा मुलगा कवडू यांनी काही दिवस मातेची सेवा करून ते नागपूरला निघून गेले.श्री नथ्थूजी भर्रे यानी नवरात्रात घटमांडण्याकरिता सुरूवात केली़ १९७० पासून नागपूरची बरीच मंडळी दर्शनाकरिता देवमुंढरीला येवू लागली.मातेचे मंदिर तयार करण्याकरिता नागपूरला वेगवेगळ्या ठिकाणी सभा होऊ लागल्यात.मातेच्या मंदिराचे जिर्णोद्धार व नियमित पुजापाठ करण्याच्या हेतूने एक पंचकमेटी तयार करण्यात आली व तिला नागपूर सहधर्मदाय आयुक्ताकडून पंजीकृत करण्यात आले.

१९८२ मध्ये मंदिराचे बांधकाम करण्यात आले.१२००० चौ.फुटाची जागा शासनाकडून मिळविण्यात आली.देवमुंढरी येथे सन १९९८ पासून आपल्यामनोकामना पूर्ण करण्याकरिता घटस्तंभाची स्थापना करण्यात येते.सन १९९८ ला २१,सन१९९९ ला ७५,सन २००० ला १११,सन२००१ ला २५१, सन २००२ ला ३५१, सन२००३ ला ४५१,सन २००४ ला ५५१, सन२००५ ला ६५१, सन २००६ ला ७१५, सन२००७ ला ७३०,२००८ ला ५०३, सन२००९ ला ७४५, सन २०१० ला ७७५, सन२०११ ला ७८५, सन २०१२ ला ७९५, सन२०१३ ला ८३५, सन २०१४ ला ८५०, सन२०१५ ला ८७५, सन २०१६ ला ८७८, सन२०१७ ला ८८७, सन २०१८ ला ९१४,सन २०१९ ला ९६५ घटांची स्थापना करण्यात आली होती.५०१ रुपये प्रमाणे असे एकूण ४ लाख ८३ हजार ४६५ रुपयांची नोंद करण्यात आलीआहे.मोहाडी येथील बसस्थानक टी- पॉईटवरील बारई राईस मिलच्या प्रांगणात असलेल्या विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे माजी व्यवस्थापक मेघराज जागोबाजी झंझाड भंडारा हे श्री भवानी माता शक्ती मंदिर पंचकमेटीचेअध्यक्षपदावर कार्यरत आहेत. पंचकमेटीच्या मार्गदर्शनाखाली अश्विन नवरात्र ते विजयादशमीनिमित्त अन्नदान करण्याचा संकल्प २०१२ पासून सुरूवात करण्यात आला आहे़.या योजनेला श्री भवानी माता शक्ती मंदिर पंचकमेटीच्या वतीने अक्षय अन्नदान योजना भाविकांच्या सहकायार्ने राबविण्यात येत आहे.अन्नदान दुपारी १२ ते ३ व रात्री ८ ते १० वाजतापर्यंत स्रेहभोजन देण्यात येत असल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनानिमित्त गर्दी राहत होती.

शनिवार दि.१७ आॅक्टोबर ते २५ आॅक्टोबरपर्यंत श्री भवानी माता शक्तीमंदिर तिर्थक्षेत्र देवमुंढरी येथे नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे़.शनिवार दि.१७ आॅक्टोबरला दुपारी १२ वाजता घटस्थापना,ज्योतप्रज्वलन करण्यात येईल.भवानीमाता शक्तीमंदिर पंचकमेटीचे अध्यक्ष मेघराज झंझाड,आसाराम पाचबुद्धे, दिगंबर धांडे,मंगेश धांडे,बाळकृष्ण पालांदू- र,नरेंद्र भुते,अशोक धांडे,डॉ.अशोक झंझाड, राजेंद्र भुते,चंदू धांडे, विनोद कहालकर,अंकूश झंझाड,सुशिल खोब्रागडे, केशवराव भुते,विनोद भुते,मंगेश तलमले, मोरेश्वर झंझाड,नागेश वाघाये,अमोल ठाकरे, निलकंठ भर्रे, नंदलाल पाटील,देवेंद्र खराबे यांच्या नेतृत्वाखाली अगदी साध्या पध्दतीने शारदीय नवरात्र उत्सव पार पाडणार आहेत. घटस्थापना करण्याºया भाविकांनासुध्दा मंदिर परिसरात प्रवेश करिता येणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *