३१ आॅक्टोबरपर्यंत लॉकडाऊनच्या कालावधीत काही उपक्रम अटी व शर्तीनुसार सुरू राहणार

प्रतिनिधी गोंदिया : केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या निर्देशानुसार प्रतिबंधित क्षेत्रातील सीमांकन व कार्यवाही पुढील आदेशापर्यंत लागू राहील. ३१ आॅक्टोबरपर्यंतच्या कालावधीत जिल्ह्यातील काही उपक्रम हे अटी आणि शर्तीच्या अधीन राहून सुरू राहतील. जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेर पुढीलप्रमाणे उपक्रम सुरू राहतील. गृहमंत्रालयाच्या परवानगीशिवाय आंतरराष्ट्रीय प्रवासात बंदी राहील. जिल्ह्यातील शाळा महाविद्यालये व शैक्षणिक संस्था तसेच कोचींग क्लासेस ३१ आॅक्टोबरपर्यंत बंद राहतील. आॅनलाईन व दूरस्थ शिक्षणाची परवानगी कायम राहिल. या शिक्षणास प्रोत्साहन दिले जाईल. शैक्षणिक संस्थेतील ५० टक्के क्षमतेने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना आॅनलाइन शिक्षण आणि संबंधित कामाकरिता एकाच वेळी उपस्थित राहण्याची परवानगी १५ आॅक्टोबरपासून देण्यात आली आहे. तथापि याकरिता आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टीने शालेय शिक्षण विभागामार्फत आदर्श कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल.

राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था औद्योगिक प्रशिक्षण संस्था,अल्प मुदतीचे प्र-ि शक्षण केंद्र येथील कौशल्य किंवा उद्योजकता प्रशिक्षणास परवानगी देण्यात येईल उद्योजकता आणि लघुउद्योग विकास राष्ट्रीय संस्था, भारतीय उद्योजकता संस्था आणि त्यांचे प्रशिक्षण देणाºयांना परवानगी देण्यात येईल.वरील उपक्रम १५ आॅक्टोबरपासून सुरू राहतील.तथापि याकरिता आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आदर्श कार्यपद्धती निर्गमित करण्यात येईल. ज्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये आॅनलाईन /दुरुस्थ शिक्षण या प्राधान्य दिले जाणाºया अध्यापन पद्धती आहे, त्यास प्रोत्साहित केले जाईल. तथापि विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रवाहातील केवळ संशोधन अभ्यासक आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण संस्था ज्यांना प्रयोगशाळेतील/ प्रायोगिक कामांची आवश्यकता असेल त्यानुसार १५ आॅक्टोबरपासून सुरू ठेवण्याची पुढीलप्रमाणे परवानगी राहील. केंद्रीय अर्थसाहित उच्च शिक्षण संस्थेकरिता.संस्था प्रमुख स्वत: समाधान करतील कि संशोधक आणि विज्ञान व तंत्रज्ञानातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेत/ प्रयोगात्मक कामासाठी आवश्यक गरज आहे.सर्व शासकीय व खाजगी ग्रंथालयांना कोविड -१ ९ संदर्भातील सामाजिक अंतराचे व स्वच्छतेचे निकष पाळून १५ आॅक्टोबरपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

तथापि याकरिता उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत आदर्श कार्यपद्धती निश्चित करण्यात येतील. विवाह समारंभाकरिता, वैयक्तिक कौटुंबिक कार्यक्रमाकरिता आणि संबंधित कार्यक्रमाकरिता ५० पेक्षा जास्त आणि अंत्यसंस्कार याकरिता २० पेक्षा जास्त लोकांची उपस्थिती असू नये. मनोरंजनाकरीता बाग, उद्याने आणि सार्वजनिक मोकळ्या जागा यांना सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील व्यावसायिक प्रदर्शने सुरू ठेवण्याची परवानगी १५ आॅक्टोबरपासून देण्यात येत आहे. त्याकरिता उद्योग विभागामार्फत आदर्श कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील स्थानिक आठवडी बाजार तसेच गुरांचे बाजार सुरू ठेवण्याची परवानगी १५ आॅक्टोबरपासून देण्यात येत आहे. तथापि ग्रामीण-शहरी संस्थेमार्फत आदर्श कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल. कोविड-१९ संदभार्तील शासनाने निर्गमित करण्यात आलेल्या सूचनांचे /नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहील. गर्दी कमी /नियंत्रित करण्याच्या उद्देशाने प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील बाजारपेठ /दुकानही २ तास अतिरिक्त सुरू ठेवण्याची म्हणजे सकाळी ९ ते रात्री ९ वाजतापर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे.

जिल्ह्यात रेल्वेने आगमन झालेल्या प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात येईल व शिक्के मारण्यात येईल. संबंधित प्रवाशांना कोविड-१९ संदर्भातील सामाजिक अंतराचे व स्वच्छतेचे नियम पाळणे बंधनकारक राहील. कोणत्याही विशिष्ट/ सामान्य आदेशाद्वारे परवानगी दिलेले उपक्रम सुरू ठेवण्यास परवानगी राहील.या व्यतिरिक्त इतर महत्त्वाच्या बाबीच्या परवानगीसाठी स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येईल. वरील आदेशाचे पालन न करणाºया संबंधित व्यक्ती तसेच आस्थापना यांच्यावर भारतीय दंड संहिता १८६० (४५) कलम १८८ शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष दीपक कुमार मीना यांनी याबाबत काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *