४६ मागण्यांसाठी दीड हजार शिक्षकांचा महाआक्रोश मोर्चा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : राज्यभरात शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे. अशैक्षणिक आणि आॅनलाइन कामे, शाळा खासगीकरणाचे आणि शाळा बंद करण्याच्या धोरणावर संताप व्यक्त करीत तब्बल दीड हजार शिक्षकांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या नेतृत्वात सोमवारी (दि.२) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात तब्बल ४६ मागण्यांचा समावेश होता. शिक्षण हक्क अधिनियमानुसार मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी शासनाची असताना खासगीकरणास पूरक धोरणे आणली आहेत. गुरुजी माहिती व उपक्रमात व्यस्त आहेत. त्यामुळे सामान्य कुटुंबातील मुलांच्या शाळा धोक्यात आल्या आहेत. शाळा सुरू झाल्यापासून राज्य शासन, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, जिल्हा परिषद अशा वेगवेगळ्या स्तरावरून शालार्थ, स्टुडन्ट पोर्टल, स्कूल पोर्टल, बदली पोर्टल, प्रशिक्षणाच्या लिंक अशी दररोज माहिती मागविली जात आहे. सरकारी शाळा बंद करणे व सरकारी शाळांचे खासगीकरण करण्यासाठी शिक्षकांना अशैक्षणिक कामात व्यस्त ठेवून शाळा व विद्यार्थ्यांची गुणवत्ता खालावून जि.प. शाळांना बदनाम करण्याचा कट रचला जात आहे.

शिक्षण विभाग याबाबत चर्चेस तयार नसल्याने २ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष किशोर बावणकर, नेते विरेंद्र कटरे, एस.यू. वंजारी, केदार गोटेफोडे, अनिरुद्ध मेश्राम, चंद्रशेखर दमाहे, शंकर चव्हाण, शिक्षक भारतीचे विभागीय अध्यक्ष प्रकाश ब्राह्मणकर, जुनी पेंशन हक्क संघटनेचे शितल कनपटे, महाराष्ट्र राज्य पुरोगामी समिती संघटनेचे हरिराम येळणे, शिक्षक संघाचे सरचिटणीस अरविंद उके, चेतन उईके, यशोधरा सोनेवाने, राष्ट्रीय संघटक नूतन बांगरे, राज्य उपाध्यक्ष आयुब खान, वाय.एस. भगत, राज्य कार्यकारिणी सदस्य उमाशंकर पारधी, अनिरुद्ध मेश्राम, जिल्हा सरचिटणीस अरविंद उके, जिल्हा कार्याध्यक्ष हेमंत पटले यांनी मोचार्चे नेतृत्व केले. जयस्तंभ चौकातील प्रशासकीय इमारतीपासून काढण्यात आलेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नेण्यात आला. या मोर्चात जिल्हाभरातील दीड हजार शिक्षकांनी हजेरी लावली होती.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.