साडेसात हजार रूग्णांची कोरोनावर मात

प्रतिनिधी गोंदिया : गेले काही दिवस कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात कमी झाला होता.आता पुन्हा संसर्ग वाढायला लागला आहे.हे आढळून येणाºया बाधित रुग्णांच्या संख्येवरून दिसून येत आहे.गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेच्या आज १६ आॅक्टोबर रोजी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात आणखी नवे १२४ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या ५६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला.जिल्ह्यात रुग्ण उपचारातून बरे होण्याचे प्रमाण ८८.२ टक्के आहे. आतापर्यंत ७५११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आहे. आज आणखी १२४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. ती रुग्ण संख्या तालुकानिहाय पुढील प्रमाणे. गोंदिया तालुका५५, तिरोडा तालुका -०२ , गोरेगाव तालुका-०५, आमगाव तालुका -२०, सालेकसा तालुका-०३, देवरी तालुका १५, सडक/अजुर्नी तालुका -११ आणि अजुर्नी/मोरगाव- १३ अशी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *