जिल्ह्यातील वाढीव पाणीपुरवठा योजनांसाठी तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता तातडीने द्या

प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत लाखांदू- र, लाखनी, साकोली आणि मोहाडी (जिल्हा भंडारा) नगरपालिका आणि पंचायतीकरिता वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्याची कारवाई तातडीने करावी असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. याठिकाणी पिण्याच्या पाण्याची अत्यंत निकड असून सर्व आवश्यक त्या परवानग्या व तांत्रिक बाबींची पूर्तत: तातडीने करण्यात येवून लवकरात लवकर काम सुरू व्हावे आणि येथील नागरिकांना दिलासा मिळावा अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. विधानभवन येथे भंडारा जिल्ह्यात नगरपालिका आणि पंचायतीकरिता वाढीव पाणीपुरवठा योजनेसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले.

यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे बोलत होते. या बैठकीस नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव महेश पाठक, सहसचिव पांडूरंग जाधव, उपसचिव डॉ. माधव वीर, जलसंपदाचे अवर सचिव वैशाली कुरणे आदीसह संबंधित अधिकारी उपस्थित होते. पिण्याचे पाणी ही जीवनावश्यक गरज आहे. लाखांदूर प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ही ग्रामीण निकषानुसार असल्याने आणि लोकसंख्या वाढल्याने या विभागातील पाण्याचा तुटवडा भासत आहे.

याचबरोबर लाखनी येथीलही पाणीपुरवठा योजना बंद असल्याने पाण्याचा प्रश्न उद्भवला आहे. याचबरोबर साकोली आणि सेंदूरवाफा गावची लोकसंख्या ही २४८९० इतकी असून येथेही पाण्याची समस्या भेडसावत आहे. सदर योजनेसाठी लागणारी पुरवठा विहीर व अ‍ॅप्रोच ब्रिज, पाण्याची टाकी, जलशुद्धीकर ण केंद्र यासाठीच्या तांत्रिक तसेच प्रशासकीय मान्यता देण्यासंदर्भात कार्यवाहीस वेग द्यावा असे निर्देश अध्यक्ष नाना पटोले यांनी संबंधितांना दिले.

जिल्ह्यातील विकास कामांना गती देण्यासाठी नगरपालिका आणि पंचायतीमधील रिक्त पदे तातडीने भरावीत !

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील नगरपंचायतीमधील विकास कामांना गती मिळावी यासाठी रिक्त पदे पदोन्नती, बदली, प्रतिनियुक्ती अथवा सेवानिवृत्त अधिका?्यांची नियुक्ती अशा माध्यमातून तातडीने भरण्यात यावी. असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोल यांनी दिले. विधानभवन येथे भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर, लाखनी, साकोली आणि मोहाडी या नगरपालिका आणि पंचायतीमधील रिक्त पदे तातडीने भरण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, वित्त विभागाचे सचिव राजीव मित्तल, सहसचिव पांडूरंग जाधव, उपसचिव कल्पिता पिंपळे आदीसह संबंधित अधिकारी उपस्थित होते. नगरपंचायतीमधील अभियांत्रीकी पदे रिक्त असल्याने विकास कामे पूर्ण करण्यास विलंब होत आहे. संबंधित विकासकामांना गती मिळावी यासाठी अभियांत्रीकी पदे व लेखा शाखेतील पदे पदोन्नती, इतर जिल्ह्यातील बदली, प्रतिनियुक्ती अथवा सेवानिवृत्त अधिकाºयांना शासकीय नियमानुसार करार पद्धतीने सेवेत घेण्याची कारवाई करून तातडीने भरण्यात यावी, असे निर्देश अध्यक्ष नाना पटोले यांनी संबंधित अधिकाºयांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *