आज १४९ रुग्णांना डिस्चार्ज

भंडारा : जिल्ह्यात आज १४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५८५२ झाली असून आज १०४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७२९६ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८०.२० टक्के आहे. आज ८०९ व्यक्तींच्या घशातील स्त्रावा चे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी १०४ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत ५८ हजार २११ व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात ७२९६ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या. जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील ४३, मोहाडी १३, तुमसर १७, पवनी १६, लाखनी ०२, साकोली ०९ व लाखांदूर तालुक्यातील ०४ व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत ५८५२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या ७२९६ झाली असून १२५९ क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या ०६ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण १८५ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८०.२० टक्के आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *