दिव्याग कल्याण विभाग दिव्यागाच्या दारी अभियान १४ आक्टोबरला

भंडारा : राज्यातील दिव्यांग बांधवांच्या अडचणी लक्षात घेता शासनाने ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. भंडारा जिल्ह्यातील हा कार्यक्रम येत्या १४ आॅक्टोबरला रोजी दिव्यांग कल्याण विभागाचे प्रमुख मार्गदर्शक आमदार श्री .बच्चू कडू यांच्या उपस्थितीत होणार आहे. या अभियानामुळे एकाच ठिकाणी दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.यासाठी नुकतीच जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची बैठक झाली.

दिव्यांगाशी संबंधित सर्व कार्यरत विभागांनी त्यादिवशी त्या कार्यक्रमात स्टॉल लावण्याचे तसेच दिव्यांगांना पूरक साधनांचे वाटप करण्याबाबत जिल्हाधिकाºयांनी निर्देश दिले. त्यांच्या नियंत्रणाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, मनीषा कुरसुंगे या समितीच्या सदस्य सचिव आहेत. शासनाने ह्यदिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारीह्ण हे अभियान सुरु केले असून आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे या अभियानाचे मुख्य मार्गदर्शक आहेत. त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात १४ आॅक्टोबरला मोठ्या व भव्य प्रमाणावर हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

दिव्यांग बांधवांमध्ये विविध प्रवर्गातील दिव्यांग आहेत. त्यातील अनेक जण विभागीय स्तरावर तसेच शासकीय कार्यालयात जाऊन आपली तक्रार नोंदवू शकत नाहीत. त्यामुळेदिव्यांगांना आपल्या अडीअडचणी मांडण्यासाठी उपाययोजना केली आहे.त्यांना विविध योजनांचा लाभ तसेच त्यांच्या विविध प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी शासनाने दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांगांच्या दारी हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या शिबिरात वैश्विक ओळखपत्र देण्याच्या कार्यक्रमाला गती मिळणार आहे. त्याचबरोबर शेत जमिनीसंबंधित कागदपत्रे, जातीचे प्रमाणपत्र व अन्य आवश्यक प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी देखील या एक दिवसीय शिबिराची मदत मिळणार आहे.

शासनाच्या विविध योजनातून तसेच सामाजिक संस्था यांच्या सीएसआर मधून उपलब्ध झालेली दिव्यांगांना लागणारी विविध उपकरणे देखील वाटप करण्यात येणार आहेत. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर श्री. कडू यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठित करण्यातआली असून त्यांची मुख्य मार्गदर्शक म्हणून या अभियानाकरिता नियुक्ती केलेली आहे. या अभियानाची सुरुवात दि. ७ जून रोजी मुंबई येथून करण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यात देखील मुख्य मार्गदर्शक यांच्या सूचनाप्रमाणे कार्यक्रम घेण्यात येणार आहे. तरी भंडाºयातील या नियोजित कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बंधू-भगिनींनी उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.