राज्य शासनाने पुसली पुरग्रस्तांच्या तोंडाला पाने

प्रतिनिधी लाखांदुर : गत आँगष्ट महिण्या अखेरीस आलेल्या भीषण महापुरामुळे हजारो हेक्टर क्षेञातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले असल्याने बाधीत शेतीकरीता राज्य शासनाकडून हेक्टरी सहा हजार आठसे रुपए तर राज्य आपत्ती व्यवस्थापन निधी अंतर्गत सहा हजार आठसे रुपए अशी एकून तेरा हजार सहासे रूपयाची हेक्टरी मदत बाधीत शेतकºयांना देण्यात येणार आहे. लाखांदुर तालुक्यातील सोळा गावांमध्ये पुर परिस्थिती निर्माण झाल्याने सदर गावांमध्ये घरांसह शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पुर ओसरताच सत्तारूढ पक्षासह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पुरग्रस्त भागाचे दौरे केले होते. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बाधित शेतीकरीता हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्याची मागणी केली होती. तर राज्य आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत मंञी विजय वडेट्टीवार यांनी पुरग्रस्त भागाचा दौरा करतांना नुकसान ग्रस्त शेतीला हेक्टरी १८ हजार रूपयाची मदत देण्याचे आश्वासन दिले होते.

माञ तहसील कार्यालयाला राज्य शासन व राज्य आपत्ती व्यवस्थापन निधी अंतर्गत प्रत्येकी सहा हजार आठसे रुपए प्रमाणे हेक्टरी तेरा हजार सहासे रूपयाचा निधी प्राप्त झाला तसेच १५ सप्टेंबर २०२०ला राज्य शासनाने नविन आदेश का- ढुन १हेक्टर मयार्देपर्यंत ६८००रु. वाढीव निधी मंजुर करण्यांत आले आहे. त्यानुसार २० हजार ४००रु.कमाल मदत दोन हेक्टर मयार्देपर्यंत मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळें नामदार वडेट्टीवार यांचे आश्वासन हवेत विरले असल्याचे शेतकर्यांत बोलले जात असून, राज्य शासनाने शेतकºयांच्या तोंडाला पाणे पुसली आहेत..

प्राप्त माहितीनुसार लाखांदुर तालुक्यातील सोळा गावांमधील सहा हजार दोनसे चौपन्न (६२५४) शेतकºयांचे ४२४९.५४ हेक्टर क्षेञातील शेतीचे नुकसान झाले होते. त्यानुसार बाधीत शेतीचे पंचनामे करून अहवाल शासनाकडे सादर केला असता, पाच कोटी ३३ लाख रूपयाचा निधी तहसील कार्यालय लाखांदु- रला प्राप्त झाला असून, दरम्यान शेतकर्यांनी शेतीत केलेला खर्च सुद्धां या तुटपुंज्या मदतीनं निघत नसल्यामुळें पुरग्रस्त शेतकरीवर्गात चिंतेचे सावट पसरले आहे .एकरी १८ ते २० हजार रु.धानशेतीला लागवडखर्च असतांना हेक्टरी ६ हजार ८००रु.मदत मिळणे म्हणजे एकप्रकारे शेतकºयांची थट्टा चालविली असल्याचे शेतकरीबांधवाकडून बोलल्या जात आहे. सदरची मदत आठ ते दहा दिवसात शेतकºयांच्या बँक खात्यावर वळती करण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार प्रदीप शेवाळे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *