देहव्यापार अड्डयावर पोलीसांची धाड

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा शहरातील रमाबाई आंबेडकर वार्ड येथे सुरू असलेल्या देहव्यापार व्यवसायावर भंडारा स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकुन एका महिलेसह तीन पुरूषांना ताब्यात घेतले. याप्रकरणी भंडारा पोलीसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. श्रावण संतोष खवस्कर, रा. लाखनी , मुकेश रामाजी कोरे रा. कनेरी पोष्ट-कोकणा जि. गोंदिया व पराग सोमेश्वर तिडके रा. लाखनीं व एक ४० वर्षीय महिला असे आरोपींची नावे आहेत. भंडारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांना मिळालेल्या गोपनिय माहीतीच्या आधारे स्थागुशाच्या पथकाने भंडारा शहरातील रमाबाई आंबेडकर वार्ड येथे सुरु असलेल्या देहव्यापाराचे ठिकाणी सापळा रचुन धाड घातली असता एक ४० वर्षाची महिला हि तीचे घरी स्वत:चे आर्थीक फायद्याकरीता महिलांना देहविक्री करण्यास प्रवृत्त करतांनी मिळुन आली.

सदर ठिकाणी देहविक्री करण्याचे उद्देशाने २ महीला व तीन ईसम मिळुन आले. याप्रकरणी ४० वर्षीय महिलेसह ३ इसमांविरुध्द पोलीस स्टेशन भंडारा येथे अप. क्र. ६७९/ २०२३ कलम ३, ४, ५ (१)(क) अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला असुन देहविक्री करण्याचे उद्देषाने मिळुन आलेल्या २ महिलांची महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. सदर कारवाइ जिल्हा पोलीस अधीक्षक लोहीत मतानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा भंडाराचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार चिंचोळकर, सहा. पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे, पोहवा तुळशिदास मोहरकर, विजय राऊत, प्रशांत कुरंजेकर, अमोल खराबे, श्रीकांत मस्के, राजु दोनोडे पोलीस नायक प्रफुल कठाणे, संदिप भानारकर, अंकोष पुराम, कौषिक गजभिये, म. पोहवा अर्चना कुथे, किर्ती तिवारी व स्थानीक गुन्हे शाखेच्या अधिकारी-कर्मचारी यांनी केली .

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.