केरोसीन चे भेसळ करणाऱ्या त्या दुकानंदारावर कारवाई करा

 

प्रतिनिधी
भंडारा- ग्राम गणेशपुर मध्ये अधिकांश लोकांचे उदरनिर्वाह हात मजुरी असून त्यांना त्यांचे दैनंदिन जीवन जगण्याकरिता केरोसिन ची अत्यंत आवश्यकता भासते आणि सरकारकडून त्यांना मुबल केरोसीन देखील प्राप्त होते .मात्र स्थानिक केरोसीन दुकानदार यांच्याकडून केरोसीन च्याऐवजी पाणी मिश्रित तेल मिळत आहे अशी तक्रार सामान्य नागरिकांना केले.
त्यावर आज आदर्श युवा मंच चे पदाधिकारी
मोक्यावर गेलो असता त्यामध्ये अक्षरशा घसलेट तेलामध्ये पाणी आढळून आला दुकानदार यांना विचारणा केली असता त्यांनी स्वतःचे व इतर दुकानदारांचे ही हाल सांगितले की हे करोसिन ठोक विक्रेता शहापूर येथील श्री दिपक अहूजा यांच्या कडून आम्हाला माती तेल अशाच प्रकारे प्राप्त होत आहे असे त्यांनी सांगितले.
त्या अनुषंगाने आज अन्न पुरवठा विभाग चे पडोळे साहेब यांना सांगितले असता त्यांचे पथक केरोसीन दुकान मध्ये आले व त्यांनी याची शहानिशा केली व आदर्श युवा मंच यांच्याकडून लोकांची होणारी लूट यावर त्वरित ठोक विक्रेता वर कारवाई करा असा पुकारा करण्यात आलेला आला. जर हा भेसळ थाबला नाही तर आंदोलनाचा इशारा आदर्श युवा मंच अध्यक्ष संस्थापक पवन मस्के समाजसेवक भंडारा यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *