रेती चोरी प्रकरणात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिहोरा : मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर व भंडारा जिल्ह्याच्या अंतिम टोकावर असलेल्या लक्ष्मी राईस मिल देवसर्राच्या पटांगणातून १६० ब्रास रेती साठा ज्याची अंदाजे किंमत २ लाख रुपये आहे. असा मुद्देमाल ताब्यात घेऊन अज्ञात आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक २२२ / २३ कलम ३७९ अन्वये काल ५ आॅक्टोंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६० ब्रास रेतीचा साठा चोरी करण्याच्या उद्देशाने अवैधरित्या बिना परवाना देवसर्रा येथील लक्ष्मी राईस मिलच्या पटांगणात ७० ब्रास रेती व देवसर्रा झूडपी जंगलात दोन वेग वेगळ्या ठिकाणी ९० ब्रास रेती मिळून आल्याने अज्ञात आरोपी विरुद्ध फिर्यादी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश गोसावी पोलीस स्टेशन सिहोरा यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन सिहोरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व या प्रकरणाचा तपास सुद्धा ठाणेदार निलेश गोसावीच करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.