आमदारांच्या अपात्रतेवर एकत्रित सुनावणीचा निर्णय २० रोजी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी ाुंबई : शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने अपात्रतेबाबत दाखल केलेल्या याचिकेवर विधानभवनात अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समक्ष गुरुवारी सुनावणी झाली. यावेळी शेड्यूल १० अंतर्गत असलेल्या तरतुदीच्या अंतर्गत सर्व याचिका एकत्रित करून सुनावणी घ्यावी, अशी मागणी ठाकरे गटाने केली. आम्हाला आणखी पुरावे सादर करायचे असल्याने वेळ वाढवून द्या तसेच या याचिकांवर स्वतंत्र सुनावणी घ्या, अशी मागणी शिवसेनेने केली. त्यामुळे पुढील सुनावणी २० आॅक्टोबर रोजी घेण्यात येईल, यावेळी अपात्रता याचिकांवर एकत्र की स्वतंत्र सुनावणी घ्यायची यावर निर्णय घेण्यात येईल, असे मिलिंद नार्वेकर यांनी स्पष्ट केले. आमदार आपत्रतेसंदर्भात दीर्घ काळ यावर काहीच कार्यवाही न झाल्याने ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. त्यानंतर सुनावणीचा कालबद्ध कार्यकह्यम जाहीर करावा, असा निर्देश न्यायालयाने दिला होता.

त्यानुसार १३ आॅक्टोबर रोजी सुमावणी होणार होती. परंतु, अध्यक्षांनी एक दिवस आधीच सुनावणी जाहीर केली. त्यानुसार आज झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवाद करीत ठाकरे गटाने दाखल केलेल्या सर्व याचिकांधील एकच मुद्दे आहेत, त्यामुळे या याचिकांवर एकत्र सुनावणी घेऊन वेळेचा अपव्यय टाळावा, अशी मागणी केली. शिवसेनेचे वकील अनिल साखरे यांच्यासह १५ वकिलांनी या मागणीला विरोध करीत आम्हाला आणखी पुरावे सादर करायचे आहेत. या याचिकांमधील मुद्दे भिन्न असल्याने त्यावर स्वतंत्र सुनावणी घेण्याची मागणी केली. यावर मिलिंद नार्वेकर यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यावर याचिकांवर एकत्र सुनावणी घ्यायची की नाही याबाबत २० आॅक्टोबर रोजी निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.