भंडारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे शेतकºयांसाठी पेंचचे पाणी सोडण्याकरीता जिल्हाधिकारी यांना निवेदन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सर्व गावातील शेतकरी यांच्या तर्फे जिल्हाधिकारी, भंडारा यांना पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्यात यावे याबाबत दिनांक १३ आॅक्टोबर २०२३ रोजी निवेदन देण्यात आले. निवेदनानुसार मौजा केसलवाड़ा, खोकरला, भंडारा, भोजापूर, बेला, गोपेवाडा, मुजबी मारेगांव, जाख, गुंजेपार, पांढराबोडी, सिरसी, जमनी, टाकळी, टवेपार, खुर्शिपार, हत्तीडोई हया शेवटी असणाºया शेतीला पाण्याची अत्यंत गरज आहे. त्यामुळे शेतातील जमिनीला भेगा पडलेल्या आहेत व धानपिक वाळत आहे. पेंच प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता अंकुलवार यांच्याशी चर्चा केली असता शेतकºयांना टोलवाटोलवीचे उत्तरे देतात. वेळेवर पाणी न सोडल्यामुळे हातात येणारे पिक एका पाण्याअभावी जाण्याचा धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे शेतकºयांना फार मोठया प्रमाणात नुकसान सहन करावे लागणार आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर होणारे नुकसान आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारे आहे. याकरीता पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्यात यावे अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.

यावेळी उपस्थितांमध्ये महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस श्र्धनंजय दलाल, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे, तालुका अध्यक्ष नरेंद्र झंझाड, कार्याध्यक्ष आरजु मेश्राम, प्रेमभाऊ भुरे, संजय सार्वे, धनराज आकरे, सोमेश्वर बाभरे, संजय बान्ते, धनराज पाठेकर, गोपीचंद बुरडे, मनोहर मेश्राम, चरणदास साकुरे, मंगेश साकुरे, रंजीत आकरे व फार मोठया प्रमाणात गावातील शेतकरी उपस्थित होते. जर दोन दिवसात आम्हाला पाणी न मिळाल्यास भंडारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व वरील गावातील सर्व शेतकºयांकडून खोकरला ते रामटेक रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. असा इशाराही देण्यात आला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.