पिण्याच्या पाण्यासाठी गेला एकाचा जीव

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : तालुक्यातील मिरेगाव येथे सुरु असलेली नळ योजना गेल्या ४ दिवसापासून बंद असल्याने पिण्याचे पाणी आणायला शेतातिल विहीरीवर गेलेल्या ईसमाचा विहीरीवर मांडलेला सिमेंट पोल तुटून विहीरीत पडल्याने मृत्यु झाला, तर दुसºयाला पोहता येत असल्याने तो सुदैवाने बचावला. गिरीपाल श्रीपत ऊईके (४२) असे मृतकाचे नाव आहे तर शिवसिंग चौव्हान असे थोडक्यात बचावाणाºयाचे नाव आहे. मौजा मिरेगाव येथे पंचायत समिती लाखनी अंतर्गत पाणी पुरवठा योजना कार्यान्वित असून नळाला पाणी न आल्यामुळे येथिल रहिवासी गिरीपाल श्रीपत ऊईके आणि शिवसिंग चौव्हान हे अंगणवाडी क्रमांक २ च्या पाठीमागे असलेल्या शेतातील विहीरीवर पाणी आणण्यासाठी गेले. विहीरीला तोंडी नसल्याने विहिरीवर सिमेंटचे पोल मांडले होते. त्या पोलवर ऊभे राहुन पाणी काढत असतांना अचानक सिंमेंटचा पोल तुटून दोघेही विहीरीत पडले, गिरीपाल यांना पोहता येत नसल्याने व पायाला दोर गुंडाळल्याने खोल विहीरीत बुडाला, तर शिवसिंग चौव्हान यांना पोहता आल्याने त्यांनी आरडाओरडा केल्याने लोक जमा झाले व त्यांनी दोराच्या सहाय्याने शिवसिंग चौव्हान यांना विहीरी बाहेर काढले. त्यामूळे त्याचा जिव वाचला. मात्र गिरीपाल याला पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यासाठी जिव गेला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.