नागपर विभागातील कालबाह्य ३७० बससमळ पवाशाचा जीव टागणीला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर: नागपूर विभागातील गणेशपेठ, घाटरोड, इमामवाडा, वर्धमाननगर, उमरेड, काटोल, सावनेर, रामटेक आगारातून धावत असलेल्या बहुतांश बसेस जुन्या झाल्या आहे. साधारणत: १२ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर ती बस रस्त्यांवर धावण्यास अयोग्य समजल्या जाते. नागपूर आगारातील ४४५ बसेस पैकी ३७० बसेसचा कालावधी १५ वर्षांपेक्षा जास्त झाला आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान एसटीचा खरखर आवाज येत असतो. तर काही एसटी बसेसच्या टीन पत्रे झाल्याने ग्रामीणमध्ये अशा बसेस धावत आहे. वारंवार दुरुस्ती किंवा वेल्डींग करुन अशा बसगाड्यांची मलमपट्टी केल्या जात आहे. या खिळखिळया झालेल्या बसेस प्रवाशांसाठी आता धोकादायक ठरत आहे. एसटी महामंडळाच्या नियमानुसार १२ लाख किमी धावलेली एसटी प्रवासी वाहतूकीतून रिटायर्ड करावे लागते. मात्र, हे सर्व नियम धाब्यावर बसवून एसटी बसेस सुसाट धावत आहे. एसटीच्या काही हिरकणी बसेसने १२ लाख किमी पल्ला पार केल्यानंतरही त्या धावत आहेत.

एकीकडे प्रवाशांची सोय तर दुसरीकडे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी सुध्दा एसटीमहामंडळात नव्या बसेस नसल्याने जुन्या बसेस चालविण्याशिवाय पर्याय नसल्याचे उत्तर महामंडळाच्या अधिकाºयांकडून दिल्या जाते. एसटीच्या बसेस जुन्या झाल्या असताना एसटीच्या ताμयात नव्या इलेक्ट्रीक बसेस करिता प्रतिक्षा करावी लागत आहे. जुन्या बसेसमध्ये तांत्रिक तक्रारी वाढल्या असून विविध त्रुट्यांमुळे धावत्या एसटीला आग लागण्याच्या घटना होतात. यांत्रिकी विभागाच्या माहितीनुसार जुन्या बसच्या आतील वायरिंग कमकुवत झाल्याने आगीच्या घटना घडतात. एसटी महामंडळात आयुष्य संपलेल्या लालपरी धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेवरप्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.बस चालविणारे ड्रायव्हर आणि कंडक्टर उघड्या वायरिंगला मलमपट्टी करून वेळ मारून नेतात. बसच्या फिटनेसकडे दुर्लक्ष केल्याने एसटीला आग लागण्याच्या घटना होत असतात. यामुळे विनाकरण प्रवाशांचा जीव जात असल्याची प्रतिक्रिया इलेक्ट्रीक विभागातील तांत्रिक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.