…तर मी आपला कायकता म्हणन काम करण्यास तयार !

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : देशातील पहिले ‘दिव्यांग कल्याण मंत्रालय’ महाराष्ट्र राज्यात सुरू करून सदर मंत्रालया अंतर्गत ‘दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांगाच्या दारी ‘ या महत्वपूर्ण अभियानादरम्यान या मंत्रालयाचे मंत्री दर्जा प्राप्त अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू १४ आॅक्टोबर ला भंडारा जिल्ह्याच्या पोलीस मुख्यालयातील चैतन्य ग्राउंडवर हजारो दिव्यांगाना या मंत्रालयाच्या योजना प्रसारित करून दिव्यांगांसाठी पुन्हा नव्याने धोरण आखण्याच्या मुख्य उद्देशाने या अभूतपूर्व कार्यक्रमास हजर होऊन प्रत्येक दिव्यांगाच्या समस्या आपुलकीने जाणून घेतल्या. तसेख् कार्यक्रम संपताच जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, खंड विकास अधिकारी आणि त्यांच्या अधिनस्त प्रत्येक शासकीय कर्मचारी वर्गाची सभा “जिल्हा नियोजन भवन” येथे घेऊन दिव्यांगांसाठी तत्परतेने प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाºयाना काम करण्याचे टाइमबॉम्ब निर्देश दिले. तदनंतर ठरल्याप्रमाणे नियोजित गोसे पुनर्वसित मौजा-सुरेवाडा(पुनर्वसन) येथील सभेला वेळेत हजर झाले. गोसेबाधितांच्या लिखित आणि तोंडी समस्यांची थेट दखल घेत नव्याने पक्षात प्रवेश करणाºया जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा प्रवेश स्वीकारला.

यावेळी आ.बच्चु कडु यांनी मार्गदर्शन करतांना आपल्या भाषणात क्षेत्रातील आमदार-खासदार यांना चांगलेच धारेवर धरत आमदार- खासदारांनी गोसेबाधितांसाठी आजपर्यंत काय केले. एखाद लाक्षणिक आंदोलन किंवा स्वत: वर गुन्हे लावुन घेतले ? असा सवाल करत गोस प्रकल्पबाधीतांची खरी पडताळणी उपस्थित प्रकल्पग्रस्त बंधू-भगिनी कडून करून घेतली. आपल्या हक्काच्या आमदारखासदारांनी प्रत्येक वेळी समस्या निपटविण्याचे खोटे आश्वासन दिल्याचे प्रकल्प बाधितांनी यावेळी बोलून दाखविले. भंडारा-नागपूर जिल्ह्यातील आमदार-खासदार गोसेबाधितांच्या समस्या निकाली काढण्यासाठी लढणार असतील तर त्यांचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासोबत काम करण्यास तयार आहे.काळे झंडे दाखविण्याचा प्रयत्न करणाºया सध्या-भोळ्या प्रकल्पग्रस्तांच्या पाठीमागून कोणकोण आपली राजकीय पोळी भाजत आहेत याची मला पूर्ण जाणीव असल्याचे आ.कडु यांनी स्पष्ट केले. गोसे प्रकल्पग्रस्तांच्या समस्या,त्यांच्या अडचणी शक्य तेवढ्या लवकर शासनास सादर प्रस्ताव ते कसे मंजूर करवून घेता येईल आणि बाधितांना लाभ कसा लवकर देता येईल, यावर पूर्ण भर असल्याचेही कळविले. यावेळी प्रहार मध्ये सामील झालेले उबेद पटेल,किशोर पंचभाई, माजी जिल्हाध्यक्ष अंकुश वंजारी, दीपक पाल,अक्षय तलमले, जयश्री वंजारी,वसंता पडोळे,संजय अतकरी,विनोद वंजारी,गुणवंत भुरे तसेच प्रकल्पग्रस्त सुरेवाडा येथील सरपंचा दीक्षा सुखदेवे,पो.पा. मंगला राघोर्ते यांचेसह कार्यकर्ते अतुल राघोर्ते, हर्षल डहारे,वसंता ठवकर, बंडू टांगले,राकेश जमजारे,राजा हजारे, रामप्रसाद ढेंगे, विजय राघोर्ते, महेश हजारे,जगदीश सुखदेवे,अमोल राऊत,नाना हजारे अनिकेत हजारे, दुधराम बावनकर,सचिन मुटकुरे,गुड्डू मडामे,मंगेश कुंभरे, एजाज अली सय्यद यांच्यासह हजारो च्या संख्येत प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.