माजी आमदार गोविंद शेंडे यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मोहाडी : माजी आमदार गोविंद उपाख्य दादा शेंडे यांचे आज दुपारी हृदयाच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे. दादा शेंडे बेटाळा शाळेचे विश्वस्त व अध्यक्ष होते. त्यामुळे ते नेहमीप्रमाणे आज दुपारी बारा वाजता दादा शेंडे १२.३० च्या दरम्यान बेटाळा येथील श्रीराम विद्यालयात गेले होते. ते मुख्याध्यापकांच्या दालनात बसले होते. शाळेच्या विकासाविषयी चर्चा करत असताना त्यांना अस्वस्थ वाटायला लागले होते. त्यामुळे शाळेच्या नजीक असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ते शिपायासोबत चालत डॉक्टर कडे गेले होते. डॉक्टरने त्यांची तपासणी केली. तात्काळ भंडारा येथे घेऊन जाण्याच्या सल्ला दिला. त्यांना भंडाºयातील एका खाजगी दवाखान्यात घेऊन गेले. त्यांना अतिदक्षता विभागात नेण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना त्यांच्या मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले. गोविंद उर्फ दादा शेंडे यांचा जन्म आंधळगाव जवळील अकोला या लहान वस्तीत झाला होता. त्यांनी मानसशास्त्र या विषयात एम. ए. केले होते. त्यांना राजकारणाची आवड होती.

सर्वप्रथम त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणात प्रवेश केला १९६७ ते १९७२ या काळात ते मोहाडी पंचायत समितीचे सभापती होते. त्यानंतर काँग्रेस पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी १९७२ च्या विधानसभा निवडणुकीत भंडारा विधानसभा क्षेत्रात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढली. त्यांचे प्रतिस्पर्धी नाशिकराव तिरपुडे यांच्या पराभव करत ते निवडून आले होते. १९७२ ते ७८ या काळात ते आमदार होते. ते चांगले वक्ते ते प्रसिद्ध होते. राजकारणातील त्यांच्या ज्ञान बघता त्यांनी राज्याच्या राजकारणात विशेष छाप निर्माण केली होती. राष्ट्रवादीचे नेते व खासदार शरद पवार यांच्या जवळचे मानले जात होते. दादा शेंडे मोहाडी पंचायत समितीचे १९६७ ते १९७२ या काळात दुसरे सभापती राहिले. १९७८ ते १९९० पर्यंत दादा शेंडे यांनी सलग बारा वर्ष जिल्हा परिषद भंडारा चे उपाध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला. त्यांच्या प्रशासनात चांगला दबदबा होता. उत्तम प्रवक्त्याच्या आवाज हरपला अशी जनप्रतिनिधी व सामान्य नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. दादा शेंडे यांच्या निधनामुळे अकोला गावात शोककडा पसरली आहे. त्यांच्यामागे पत्नी, तीन मुले, दोन मुली असा आप्त परिवार आहे. उद्या त्यांच्या पार्थिवावर सकाळी नऊ वाजता अकोला येथील स्थानिक गावी अग्निसंस्कार केला जाणार आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.