आ. भोंडेकर यांच्या नेतृत्वात धान केंद्र संचालक मंडळाला मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : आधारभूत शासकीय हमीभव अंतर्गत धान खरेदी करणाºया ‘ब’ वर्ग संस्थाना सुरक्षा ठेव व अनामत रक्कम दुप्पट करण्याचे पणन विभागाचे आदेश रद्द करण्याच्या मागणी साठी भंडारा व पवनी तालुक्यातील केंद्र संचालकांच्या शिष्ट मंडळाने आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. दिवाळी सणाच्या तोंडावर ध्यान खरेदी प्रभावित होवू नये या करीता ही अट शिथिल करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले व तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही पणन विभागाच्या सचिवांना देण्यात आले.२०२२-२३ च्या खरीप व रब्बी हंगामात हमी भाव धान खरेदी अंतर्गत खरेदी करणाºया ‘ब’ वर्गातील संस्थांना ५० लक्ष सुरक्षा ठेव आणि १० लक्ष रुपये अनामत रक्कम भरण्याची अट होती. मात्र १२ आॅक्टो. २०२३ च्या पणन विभागाच्या सरव्यवस्थापकांच्या आदेशानुसार यात दुपट्टीने वाढ करून १ कोटी रुपये सुरक्षा ठेव तर २० लक्ष रुपये अनामत रक्कम करण्यात आली आहे. ऐन हंगाम सुरू असतांना एवढी मोठी रक्कम भरणे शक्य नसल्याने ‘ब’ वर्गसंस्थानांनी धान खरेदी न करण्याचा इशारा निवेदन द्वारे दिल होता.

आमदार नरेंद्र भोंडेकर यांना या संबंधीचे निवेदन प्राप्त होताच ऐन दिवाळीच्या तोंडावर धान खरेदी न झाल्याने शेतकरी अडचणीत येईल ही बाब लक्षयत येताच त्यांनी तातडीने मुंबई गाठून ‘ब’ वर्ग संस्थांचे प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समक्ष मांडले. वस्तुस्थिती ध्यानात येताच मुख्यमंत्र्यांनी शेतकरी अडचणीत येणार नाही याची काळजी घेत अटी शिथिल करण्याचे आश्वासन ‘ब’ वर्ग संस्थांच्या प्रतिनिधींना दिले. सोबतच या संबंधीचा प्रस्ताव तातडीने शासनास पाठविण्याचे निर्देश पणन सचीवास दिले. यामुळे भंडारा जिल्ह्यातील खरीपच्या धान खरेदीत निर्माण झालेला पेच सुटला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला आम. नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात भेटीला गेलेल्या शिष्टमंडळात देवाभाऊ घावळे, सुधाकर साठवणे, विनोद तलमले, कार्तिक देशमुख, प्रदीप जांभूळकर, नाना बावनकुळे, रामकृष्ण गायधने, सुनील गिºिहपुंजे, चंदू माकडे, विनोद मुरकुटे, धनराज वैरागाडे आदींचा समावेश होता.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.