वैद्यकीय महाविद्यालयात एक्स-रे फिल्मचा अभाव

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असो की जिल्हा रुग्णालय, या रुग्णालयांचे नाव घेताच असंख्य समस्या दिसून येतात. आता एक नवीन समस्या समोर आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गरजू रुग्णांचे एक्सरे काढले जातात, मात्र एक्स-रे फिल्म नसल्याने रुग्णांच्या अँड्रॉईड मोबाईलवर रिपोर्ट पाठवले जात आहेत. त्यामुळे रुग्ण आणि त्याच्या कुटुंबियांसमोर एक नवीन समस्या निर्माण झाली आहे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य व जिल्हा महिला रुग्णालयात जिल्ह्यातील गरीब व गरजू रुग्ण उपचारासाठी येतात. यातील बहुतांश रुग्ण त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळेइतके कमकुवत आहेत की त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत. मात्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात क्ष-किरण काढले असता क्ष-किरण अहवाल फिल्मऐवजी रुग्णांच्या मोबाईलवर पाठवला जातो. याबाबत संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांना विचारणा केली असता, फिल्म नसल्याने रुग्णांचे रिपोर्ट्स त्यांच्या अँड्रॉईड मोबाईलमध्ये दिले जात असल्याचे ते सांगतात.

पणज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही अशा रुग्णांना सर्वात मोठी समस्या भेडसावत आहे. असे असतानाही क्ष-किरण अहवालाच्या नावाखाली रुग्णांकडून एक्स-रे फी वसूल केली जात आहे. जिल्ह्यातील एकही लोकप्रतिनिधी या समस्ये कडे लक्ष देत नाही. रुग्णालयात दुर्घटनाग्रस्त रुग्णांना एक्स-रे काढण्यास सांगितले जाते. मात्र त्यांना एक्स-रे फिल्म ऐवजी मोबाईलवर एक्स-रे रिपोर्ट दिला जातो. यासंदर्भात विचारणा केल्यास एक्स-रे काढणाºयांची संख्या वाढल्याने एक्स-रे फिल्म देणे शक्य होत नसल्याचे सांगितले जाते. मात्र संबंधित विभागाला तक्रार केलयावरही कोणतीच उपाययोजना होत नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते कुसन अग्रवाल यांनी सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.