विधानसभा क्षेत्रातील गावांतर्गत मुलभूत सुविधेसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : शहरी भागातील वैशिष्ट्यपूर्ण विकास कामांसाठी दहा कोटी रुपयांचा निधी खेचून आणल्या नंतर आता आमदार नाना पटोले यांनी विधानसभा क्षेत्रातील गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या कामांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. विधानसभा क्षेत्रातील सर्वांगीण विकासासाठी आमदार पटोले यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. आ.पटोले यांनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील सुविधा पुरविण्यासाठी (लेखाशीर्ष २५१५ १२३८) या योजनेंतर्गत सन २०२३ – २४ या वित्तीय वषार्साठी साकोली विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागातील विविधविकासकामांसाठी ५ कोटी रुपयांच्या निधीची प्रशासकीय मान्यता मिळवून दिली आहे. सदर योजनेअंतर्गत यापूर्वी सुध्दा आ. पटोले यांनी १० कोटी रुपयांच्या निधीची उपलब्धता करून ग्रामीण क्षेत्रातील नागरी सूविधेच्या विकास कामांना गती दिली आहे. काही कामे पूर्ण झाली असून अनेक गावांतील विकास कामे प्रगतीपथावर आहेत.

सदर विकास कामांमध्ये गावातील सिमेंट रस्ता, चावळी, समाज मंदिर सभागृह, गावातील सौंदर्यीकरण, आवारभींत सारखी नागरी सूविधेच्या ५७ विकास कामांचा समावेश आहे. त्यामध्ये साकोली व लाखनी तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील नागरी सूविधेकरीता ४ कोटी १० लक्ष रुपये आमदार नानाभाऊ पटोले यांनी सुचविलेल्या ४६ विकास कामांकरिता मंजूर करण्यात आले आहेत. तसेच लाखांदूर तालुक्यातील ग्रामीण भागातील ९० लक्ष रुपयांच्या ७ विकास कामांकरिता निधी मंजूर करण्यात आला आहे. साकोली विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागातील विविध विकास कामांकरिता आमदार पटोले यांनी सातत्याने पाठपुरावा करून तीन्ही तालुक्याकरीता ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. विधानसभा क्षेत्रातील बहुतांश जि. प. सदस्य पं.स. सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी आ. पटोले यांच्या कार्यप्रणालीवर समाधान व्यक्त करून आभार मानले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.