डॉ. अविनाश आचार्य एलएलबी परिक्षेत गुणवता श्रेणीत उत्तीर्ण

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने विधी शाखे अंतर्गत घेतलेल्या एलएलबी परिक्षेत डॉ. अविनाश आचार्य यांनी सरासरी ९.०९ श्रेणी अंक प्राप्त करीत गुणवत्ता यादीत स्थान पटकाविले आहे. डॉ. अविनाश आचार्य हे महावितरणच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयात वरिष्ठ व्यवस्थापक (मानव संसाधन – विधी) या पदावर कार्यरत असून अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर आणि व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर परीक्षा प्राविण्य श्रेणित उत्तीर्ण असलेले डॉ. आचार्य यांना यापुर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने व्यवसाय प्रशासन आणि व्यवसाय व्यवस्थापन या शाखेअंतर्गत सादर केलेल्या शोधप्रबंधाकरिता पीएचडी पदवी बहाल केली आहे. ‘२००० ते २०१०’ या कालावधीत महावितरण मधील प्रशिक्षण कार्यक्रमांची आखणी व आयोजन यांचा विश्लेषणात्मक अभ्यास आणि संस्थेच्या विकासावर त्याची प्रभावीता (Analytical study of designing and conduction training programmes in MSEDCL from 2000 to 2010, and its effectiveness on the developmentof the organization)
या विषयावरील त्यांच्या या शोधप्रबंधासाठी ही पदवी बहाल करण्यात आली आहे त्यांच्या या यशाबद्दल महावितरणमध्ये त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.