रुग्णवाहिका चालक २० महिन्यांपासून वेतनविना

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका पुरविण्यात आल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या रुग्णवाहिकांच्या चालकाचे नियोजन एका कंत्राट कंपनीच्या माध्यमातून केले जाते. मात्र, गेल्या २० महिन्यापासून रुग्णवाहिका चालकांच्या कंत्राट कंपनीचा तोडगा निघालेला नाही. त्यामुळे रुग्णवाहिका चालक २० महिन्यापासून वेतनविनाच सेवा पुरवित आहेत. आरोग्य क्षेत्रामध्ये रुग्णवाहिका हे महत्वाचे साधन आहे. जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका पुरविण्यात आल्या आहेत. यात १०२ क्रमांकाची सेवेचा समावेश आहे.

या क्रमांकावर संपर्क करणाºया गरोदर माताना रुग्णवाहिकेची सेवा पुरविली जाते. तसेच या रुग्णवाहिकांच्या माध्यमातून इतर रुग्णांची ने-आण केली जाते. रुग्णवाहिकांच्या चालकांचे कर्तव्याचे नियोजन गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राट कंपनीच्या माध्यमातून होत आहे. परंतु काही महिन्यापासून कंत्राटी कंपनी नियुक्त करण्यात आलेली नाही. मात्र, रुग्णवाहिका चालकांची सेवा कायम ठेवण्यात आली आहे. अशा परिस्थितीतही कोरोना संसर्गाच्या काळात रुग्णवाहिका चालकांनी जीवाची पर्वा न करता सेवा पुरविली. तुटपुंज्या मानधनातून रुग्णवाहिका चालक कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. अशात २० महिन्यापासून वेतन मिळाले नसल्याने त्यांच्यापुढे आर्थिक संकटासह अनेक समस्या निर्माणझाले आहे. असे असताना रुग्णवाहिका चालकांचे वेतन देण्यासंदर्भात आरोग्य विभागाकडून पावले उचलली जात नसल्याने चालकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.