हौसला और रास्ते ठरला ‘महोत्सव विशेष लक्षवेधी लघुचित्रपट’

भंडारा : दिल्ली येथे दि. २८ आॅक्टोबर २०१८ ला पार पडलेल्या सातव्या दिल्ली आंतरराष्ट्रीय लघु-चित्रपट महोत्सवात “हौसला और रास्ते” हा लघुचित्रपट दाखवला गेला. यासह जगभरातील जवळपास ५५ देशातील ४०० पेक्षा चित्रपट या चित्रपट महोत्सवात दाखवले गेले. आणि या महोत्सवात ‘हौसला और रास्ते’ ‘महोत्सव विशेष लक्षवेधी लघुचित्रपट’ म्हणून गौरविल्या गेला. श् ा े त् ा क र ी आत्महत्या आणि त्यांच्या परिवाराच्या समस्या या ज्वलंत विषयावर हा लघुचित्रपट तयार केलेला आहे. चित्रपटाचे निमार्ता चेतन भैरम आहेत तर रोशन भोंडेकर या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

सिनेमॅटोग्राफी तथा संगीत दिग्दर्शन प्रशांत चव्हाण (मुंबई) यांनी केले आहे. अक्षित रोहडा (गुजरात) यांनी सहाय्यक सिनेमेटोग्राफर म्हणून काम केलेलं आहे. प्रशांत वाघाये सहनिमार्ता आहेत तर योगेश भोंडेकर सहनिमार्ता आहेत आणि इंस्ट्रक्टर इमरान शेख आहेत. गुजरातचे अभिनेते मौलिक चव्हाण, हिमांशी कावळे प्रमुख भुमीकेत आहेत तसेच संजय वनवे, अतुल भांडा- रकर, अंजली भांडारकर, सुरेश जोशी, सरोजलता बर्वे, स्वप्निल जांगळे, नीलेश हंबरडे यांच्या भूमिका देखील या चित्रपटात आहेत. या पुरस्कारामुळे चित्रपटाच्या सर्व घटकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *