विदर्भात मुसळधार पाऊस

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर: राज्यातील अनेक भागाला सोमवारी वादळीवाºयासह मुसळधार पावसाने झोडपले, पण पावसाचा कहर थांबलेला नाही. तर आणखी दोन दिवस विजेच्या कडकडाटासह वादळी वारा आणि पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यातील तापमान गेल्या १५ दिवसात ४५ अंश सेल्सिअस आणि आता ४० ते ४२ अंशादरम्यान असताना बहूतांश भागांमध्ये हवामानात पुन्हा काही महत्त्वाचे बदल झाले आहेत. राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस तर काही भागात गारपिट देखील झाली. सोमवारी नागपूर शहरातही अवघ्या तासाभरात वादळीवाºयासह कोसळलेल्या मुसळधार पावसाने झोडपले.

यात शहरातील मोठमोठे वृक्ष, विजेचे खांब कोसळले. तर एमआयडीसी परिसरात चक्क ट्रक पलटी झाले. सोमवारी पुण्यात देखील असेच काहीसे दृश्य पाहायला मिळाले. नागपूरच नाही तर मुंबईसह कोकण पट्ट्यावरही आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे काही भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळतील. तर, राज्याच्या काही भागांवर पावसाळी ढगांचे सावट असेल, पण हा मान्सून नाही, असेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. हवामानातील हे बदल महाराष्ट्रातच नाही तर राजस्थान, जम्मूकाश्मीर, हिमाचल प्रदेश, हरियाणा, दिल्ली येथेही वादळीवाºयासह मूसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.