आश्वासनानंतर गावकºयांचे उपोषण मागे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मोहाडी : प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल बांधकामाची परवानगी द्यावी, अशी मागणी करीत सालई खुर्द येथील शिवाजी नगरमधील २०० लाभार्थी भर उन्हात ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. या उपोषणकर्त्यांची मोहाडीचे सभापती रितेश वासनिक, सहाय्यक गटविकास अधिकारी भुजाडे, ठाणेदार नितीनचंद्र राजकुमार,विस्तार अधिकारी बडोले,मंडळ अधिकारी मिश्रा,तलाठी कटरे यांनी भेट घेतली. यावेळी पूर्वी सदर जागेवर तीन घरकुलांचे बांधकाम करण्यात आले होते, त्याच धरतीवर घरकुलाचे बांधकामाला ग्रामसभेत ठराव घेऊन मोहाडी प.स. व भंडारा जि.प.लाठराव पाठवून मंजूरी करून नमूना ८ वर अतिक्रमणाची नोंद मागे घेण्याच्या आश्वासन दिल्यानंतर निंबू पाणी पाजून उपोषण सोडण्यात आले.

सालई खुर्द येथील नागरिक मागील ३०-३५ वर्षांपासून वास्तव्य करीत असल्याने गोरगरीब, वंचित, बेरोजगार, बेघर लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवासयोजना अंतर्गत लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर असून सुद्दा त्या अतिक्रमण जागेवर ग्रामपंचायत बांधकामाची परवानागी देत नसल्यामुळे लाभार्थ्यांनी एल्गार पुकारून ग्रामपंचायत समोर बेमुदत उपोषणाला बसले होते.याबाबत प्रशासनाकडे अनेकदा निवेदने देऊनही नमुना ८ वर अतिक्रमण धारकांना पूर्वी प्रमाणे नमुना ८ तयार करून घरकुल बांधकामाची परवानगी देण्याची मागणी करण्यात आली होती.मात्र ग्रामपंचायत व प्रशाशनाने याबाबीकडे दुर्लक्ष केले.

ग्रामपंचायत समोर सर्व मंजूर झालेल्या घरकुलांचे बांधकाम त्वरित करण्याचे व लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभ देण्याची मागणी करून ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले होते. मात्र नमुना ८ वर अतिक्रमण असल्याने तीन वर्षांपासून घरकुल योजनेपासून वंचित होते. मात्र यापूर्वी सदर जागेवर २०१३-१४ मध्ये नमुना ८ वर अतिक्रमण म्हणून नोंद नव्हती, कोणताही ठराव न घेता नमुना ८ वर ग्रामपंचायतीने नोंद केली होती, मात्र २०१४-१५ च्या धरतीवर ग्रामसभेचा ठराव घेऊन प.स. व जि. प. मध्ये मंजुरी करून पूर्वी प्रमाणे नमूना ८ तयार करून लाभार्थ्यांना घरकुल देण्याचे लिखित आश्वासन सहाय्यक गट विकास अधिकारी भुजाडे यांनी दिले.यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले.यावेळी मोहाडीचे सभापती रितेश वासनिक, सहायक गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी बडोले, ठाणेदार नितींचंद्र राजकुमार, ग्रामसेवक प्रदीप चामाटे यांनी उपोषणकर्ते गणेश राणे, प्रफुल मेश्राम, विष्णू राऊत, प्रकाश पटले, लाखन ठाकरे, संभा मांढरे, परसराम मांढरे, बेनिराम मांढरे,रामचंद्र कोहरे, शिवदास पटले, भोजराम राणे,रेखा रडगे,शालू राणे, लत्ता पटले, गीता भौतिक आदींना निंबू पाणी पाजून त्यांचे उपोषण सोडले. यावेळी सरपंच अनिता पटले, उपसरपंच बबलू सव्वालाखे,नितीन लिल्हारे,अशोक पटले, लालचंद ठाकरे,सचिन पटले,उद्देशिंग लिल्हारे, एमरीत ठाकरे,श्रीकांत बन्सोड, नंदलाल लिल्हारे, शिवदास दमाहे,शिवा पटले,भीमा ठाकरे,झनकलाल दमाहे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.