खोकरला येथे आंतराराष्ट्रीय योगा निमित्त प्रोटोकाल वर्गाचे उद्घाटन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : खोकरला पंतजलि योग समितीच्या वतीने खोकरला येथे आंतर्राष्ट्रीय योग दिनानिमित्त प्रोटोकाल नि:शुल्क प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंतजलि योग समितीचे रमेश खोब्रागडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पंतजलि योग समितीचे जेष्ठ योग शिक्षक मारोती पुडके, सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, खोकरला पतंजलि योग समितीचे अध्यक्ष यशवंत बिरे, योग शिक्षक दिलीप वालदे, नितीन कढव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व्दिप प्रज्वलीत करून आंतराष्ट्रीय योग दिन प्रोटोकाल नि:शुल्क प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन करण्यात आले. आणि मान्यवरांनी आंतराष्ट्रीय योगदिना निमित्त उपस्थित सर्व योग साधकांकडून प्रात्यक्षिक करवून घेत सविस्तर मार्गदर्शन केले.

तसेच योग साधक सुरेंद्र पांडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्यारेलाल शहारे व प्रास्ताविक पतंजलि योग समितीचे अध्यक्ष यशवंत बिरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार अंजली बोरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सुरेंद्र पांडे, श्रद्धा पांडे, रामलाल शेंडे, गीता आगासे, गणेश सार्वे, तेजराम बहेकार, बंडूभाऊ बेहरे, शालीनी बैस, दामोधर बोदेले, मीना रोकडे, कल्पना दमाहे, बाबुलाल दमाहे, लक्ष्मीनारायण भिवगडे, पंचकुला पटले, सुरेश घोडे, शामराव गौरी, बाबुलाल पाटील, गणेश उपासे, महादेव वंजारी, जयश्री दुधकवार तसेच पतंजली योग समिती खोकरला येथील महिला व पुरुष योग साधकांनी सहकार्य केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.