जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी वृषाली देशमुख यांचे कार्यालयातर्फे सत्कार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : येथील जिल्हा मृदा सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी भंडारा येथे साकोली येथील कृषी अधिकारी वृषाली गजानन देशमुख या नुकत्याच रुजू झाल्या आहेत. या निमित्ताने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन भंडारा तालुका कृषी कार्यालय व जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी भंडारा कार्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे ज्या कार्यालयात पुरुषाने देशमुख यांनी कृषी सेवक म्हणून कृषी विभागात नोकरीची सुरुवात केली त्याच कार्यालयात पदोन्नतीने जिल्हा मृदा सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी पदी त्या आज रुजू झाले आहेत. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्या अत्यंत मनमिळावू स्वभावाच्या असून अधिकारी कर्मचाºयांमध्ये त्यांनी एक शिस्तप्रिय अधिकारी म्हणून नावलौकिक मिळवला आहे.

२००४ साली त्या कृषी सेवक म्हणून कृषी विभागात भंडारा येथे रुजू झाल्या होत्या. त्यानंतर २०१३ ला महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कृषी अधिकारी पदी भंडारा येथे त्यांची निवड झाली. त्यानंतर २०१७ ला तालुका कृषी अधिकारी लाखनी येथे कृषी अधिकारी पदावर रुजू झाल्या. त्यानंतर २०२९ ला साकोली येथे कृषी अधिकारी पदावर त्यांची बदली झाली. आणि आता २०२३ ला त्या जिल्हा मृदा सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी म्हणून भंडारा येथे रुजू झाले आहेत. त्यांच्या सत्कार प्रसंगी भंडारा तालुका कृषी कार्यालयातील अरविंद धांडे, नरेश बावनकर, वैशाली शहारे, रजनी माहुलकर, संतोषी पुडके, एम. टी. गडमडे, लक्ष्मीकांत बुट्टे यावेळी उपस्थित होते. यावेळी जिल्हा मृद सर्वेक्षण अधिकारी वृषाली देशमुख यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संगीता माने यांच्या मार्गदर्शनात जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने काम करून जिल्ह्यातील शेतकºयांना न्याय देणार असल्याचे सांगितले. ज्या कार्यालयातून कृषी सेवक पदापासून सुरुवात केली तेथेच आज जिल्हा मृद सर्वेक्षण अधिकारी अधिकारी पदी रुजू झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.