गोवंश तस्करी, गोमांस कत्तलीवर आळा घाला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : ईदनिमित्त होणाºया अवैध गोवंश तस्करी आणि गोमांस कत्तलीवर प्रशासनाने आळा घालावा, अशी मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने आज, २० ाकांना निवेदन देवून केली. निवेदनानुसार, जिल्हा अवैध गोवंश तस्करी व गोपंशाची कत्तल करून मोठ्या प्रमाणात वितरणाचे केंद्र बनले आहे. जिल्ह्यातून अवैध तस्करी व कत्तल होत असल्याच्या घटना दररोज समोर येत आहेत. त्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या जात आहे. काही दिवसांवर असलेली ईद लक्षात घेऊन प्रशासनाने नाकाबंदी करावी, जिल्ह्यातील प्रमुख मार्ग आणि ज्या ठिकाणी गोहत्या होतात अशा ठिकाणी छापे टाकून राज्य शासनाच्या गोहत्या बंदी कायद्यानुसार कारवाई करावी.

अन्यथा बजरंग दल आपल्या श्रद्धेनुसार हिंदू समाजाला सोबत घेऊन व गस्त घालून गोवंश वाचवण्याचा प्रयत्न करेल, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना विहिपंचे जिल्हा सहमंत्री डॉ. सुनील जी कोहडे, विहिंप जिल्हा सत्संग प्रमुख महेंद्र देशमुख, विहिंप जिल्हा सेवा प्रमुख वसंत ठाकूर, जिल्हा गोरक्षण प्रमुख बलराम व्यास, बजरंग दलाचे जिल्हा समन्वयक सुभाष पटले, कुलकर्णी, राजू महारवाडे, प्रमोद सहारे, सुभाष गायधने, हार्दिक जिवानी, लिकेश पाथोडे, राजू लारोकर, सागर परिहार, सोनू कौशिक आदी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.