भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : अवैधरीत्या रेतीची वाहतुक करणाºया ट्रॅक्टरवर कारवाई न करता सोडण्याच्या मोबदल्यात रेती ट्रॅक्टरमालकाला २५ हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती २० हजार रूपयाची लाच स्विकारण्याची तयारी दर्शविणाºया लाचखोर तलाठ्यास भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी अटक केली.वैभव जनार्धन जाधव वय २७ वर्षे तलाठी रोहा ता.मोहाडी जि.भंडारा असे लाचखोर तलाठयाचे नाव आहे. तक्रारदाराचा ट्रॅक्टरने वाळू, गिट्टी, सिमेंट वाहतूकीचा व्यवसाय असुन दिनांक ११ मार्च २०२४ रोजी तक्रारदार यांच्या मालकीचा ट्रॅक्टर अवैधरीत्या रेतीची वाहतूक करीत असताना तलाठी वैभव जाधव यांनी पकडला मात्र त्यावर कारवाई न करता रेतीचा ट्रॅक्टर सोडवीण्याश्या मोबदल्यात २५ हजार रुपये लाचेची मागणी केली. मात्र तक्रारदार यांच्याकडे त्यावेळी पैसे नसल्याचेतलाठी जाधव यांना सांगीतले. त्यावर तलाठी जाधव यांनी ‘तुझ्यावर विश्वास ठेऊन तुझा ट्रॅक्टर सोडतो पण उद्या पैसे आणून दे’ असे बोलुन रेती वाहतुकीचा ट्रॅक्टर सोडुन दिला. तक्रारदाराची तलाठी यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी १२ मार्च २४ रोजी भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीच्या अधिकाºयांनी दिनांक १२ मार्च २०२४ रोजी पडताळणी केली असता तलाठी जाधव यांनी तक्रारदाराकडे २५ हजार रुपये लाचेची पंचासमक्ष मागणी करून तडजोडी अंती २० हजार रूपयाची लाच स्विकारण्याची तयारी दर्शविली.
आज दि. ८ मे २०२४ रोजी एसीबीच्या पथकाने तलाठी जाधव यांना रंगेहात अटक करण्याकरीता सापळा रचला असता तलाठी जाधव यांना संशय आल्याने त्यांनी तक्रारदाराकडून लाच रक्कम स्वीकाण्यास नकार दिला. या प्रकरणी पोलीस स्टेशन मोहाडी येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून तलाठी जाधव यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर परिक्षेत्राचे पोलीस अधिक्षक राहुल माकणीकर,अप्पर पोलीस अधिक्षक सचिन कदम,अप्पर पोलीस अधिक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनात एसीबीचे पर्यवेक्षण अधिकारी पो.उप.अधीक्षक डॉ. अरुणकुमार लोहार,भंडारा एसीबीचे पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के , पो हवा.र मिथुन चांदेवार, पोना. अतुल मेश्राम, पोना. नरेंद्र लाखडे , पो. शि. विवेक रणदिवे, पो .शि. चालक राहुल राऊत , पोलीस निरीक्षक अमित डहारे, पोलीस उप निरीक्षक संजय कुंजरकर, पो. ना. शिलपेंद्र मेश्राम , पो .शि. चेतन पोटे, पो. शि. मयूर सिंघनजुडे, म. पो .शि. अभिलाषा गजभिये यांनी केली.