५ महिन्यापूर्वी काळवीटाची शिकार होऊनही वन विभागातर्फे अद्यापही गुन्हा दाखल नाही

रमाकांत खोब्रागडे तिरोडा : तिरोडा वन परीक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या पालडोंगरी येथे जानेवारी महिन्यात काळवीटाची शिकार होऊन वन कर्मचाºयांनी मृत काळवीटास न जाळता खड्डा खोदून दफन करण्यात आल्याने वन्यजीवप्रेमीने याबाबत माहितीचे अधिकारात माहिती मागितली असता आज पर्यंत माहिती न दिल्याने वन्यजीव प्रेमींनी वनमंत्री महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी गोंदिया, पोलीस अधीक्षक गोंदिया, उपविभागीय दंडाधिकारी तिरोडा व थानेदार पोलिस स्टेशन तिरोडा यांना लेखी तक्रार देऊन या प्रकरणात दोषी अधिकारी कर्मचाºयांवर कार्यवाही न झाल्यास उपवन संरक्षन कार्यालय गोंदियासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तिरोडा वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या पालडोंगरी येथे ७ जानेवारी २४ रोजी वर्ग एक मध्ये मोडत असलेल्या वन्यजीव काळवीट हरणाची शिकार झाली असून या मृत हरणाचे पोस्टमार्टम न करता पालडोंगरीचे तलावाजवळ वन कर्मचाºयांनी खड्डा खोदून हरणास दफन केल्याने वन विभागाकडे वन्यजीवांचे संरक्षण करण्याची जबाबदारी असुनही वन अधिकारी कर्मचाºयांनी आपले कर्तव्याचे पालन न करता हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याने एकोडी येथील वन्यजीव प्रेमी समीर केशोराव गभणे यांनी माहितीचे अधिकारात वन विभागाकडे माहिती मागितली असता त्यांना माहितीही देण्यात आली नाही.

ज्यावरून त्यांनी हे प्रकरण वन विभागाकडून दाबण्यात येत असल्याचा समज झाल्याने आज दिनांक २० मे २०२४ रोजी वन मंत्री महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी गोंदिया, पोलीस अधीक्षक गोंदिया, उपविभागीय दंडाधिकारी तिरोडा व थानेदार तिरोडा यांचेकडे तक्रार करून या प्रकरणात दोषी अधिकारी कर्मचाºयांवर कार्यवाही न झाल्यास आपण उपवनसंरक्षण कार्यालय गोंदियासमोर आंदोलन करू असा इशारा दिला आहे. याबाबत केरोडा वनपरिक्षेत्र अधिकारी मुन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण सध्या व्यस्त असून नंतर आपणास या प्रकरणाबाबत माहिती देऊ असे सांगितले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *