भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : समाज संघटित असेल तरच व्यक्ती आणि समाजाची प्रगती होत असते म्हणून समाजाने संघटित होऊन आपल्या अधिकारासाठी लढा दिला पाहिजे असे मत डॉ. बाळकृष्ण सार्वे यांनी मांडले ते गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमात बोलत होते. बावणे कुणबी समाज सेवा संघाच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम संत तुकाराम सभागृह भंडारा येथे घेण्यात आला. गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सदानंद इलमे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ओबीसी जागृती मंचचे जिल्हाध्यक्ष डॉ. बाळकृष्ण सार्वे, कुणबी समाज केंद्रीय कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष समाजभूषण शालिकराम कुकडे प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ.रामकृष्ण पाटेकर तर अतिथी मधुकर बांडेबूचे व देवराम सार्वे विचारपीठावर उपस्थित होते. मान्यवारांच्या हस्ते इयत्ता दहावी मध्ये ९०% व बारावी मध्ये ८५%पेक्षा जास्त गुण मिळवणारे तसेच इयत्ता सह- ावी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण आणि पात्र तसेच नवोदय परीक्षा, नीट परीक्षा तसेच राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू यांचा बावणे कुणबी समाज सेवा संघाच्या वतीने समाजातील पन्नास गुणवंत विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाची सुरवात जगद्गुरू संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमाना माल्यार्पण करून झाली. विचारपीठावर उपस्थित मान्यवारांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होऊन सांगता अल्पहाराने झाली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. उमेश सिंगनजुडे तर प्रास्ताविक योगशिक्षिका अंजली बांते तर आभार मंगला डहाके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभू मने, वामन गोंधूळे, मनोज बोरकर, महेश कुथे, मधुकर चौधरी, के. झेड. शेंडे, उमेश मोहतुरे, सुरेश वैद्य, कमलेश सार्वे, प्रदीप कडव, शंकराव निंबार्ते, हर्षा झंझाड, अनिता बोरकर, जयश्री बोरकर, रोशनी पडोळे, आशा गायधने, स्वाती सेलोकर, रत्ना इलमे, सुरेखा खाटिक यांनी विशेष सहकार्य केले.