महावितरणच्या राज्यस्तरीय नाटयस्पधत कोकण विभागाच ‘डबल गम’ पथम, तर नागपर विभागाच ‘नथिग ट स’ द्वितीय

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर :- महावितरणच्या राज्यस्तरीय आंतर प्रादेशिक विभाग नाट्यस्पर्धेत कोकण प्रादेशिक विभागाने सादर केलेल्या ‘डबल गेम’ नाटकाने सांधिक नाट्यनिर्मिती प्रथम क्रमांकासह वैयक्तिक गटात पाच पारितोषिके पटकावली. ‘नथिंग टु से’ या नागपूर प्रादेशिक विभागाने सादर केलेल्या नाटकृतीस द्वितीय पारितोषिक मिळाले. महावितरणचे संचालक (संचालन तथा मानव संसाधन) अरविंद भादिकर यांचे हस्ते १३ जुलै रोजी पारितोषिक वितरण करण्यात आले. नागपूर येथील वसंतराव देशपांडे सभागृह येथे आयोजित या दोन दिवसीय नाट्यस्पर्धेत पुणे प्रादेशिक विभागाने ‘ती फुलराणी’, छत्रपती संभाजी नगर प्रादेशिक विभागाने ‘उत्तरदायित्व’, कोकण प्रादेशिक विभागाने ‘डबल गेम’, आणि नागपूर प्रादेशिक विभागाने ‘नथिंग टु से’ असे एकापेक्षा एक दजेर्ददार नाट्यकृती सादर केल्या. यावेळी बोलतांना अरविंद भादिकर म्हणाले की, या नाट्य स्पर्धेत मिळलेली ऊर्जा आपण सर्वांनी आपल्या दनंदिन कार्यालयीन कामात वापरून व्यवस्थापनाची अपेक्षा पुर्ण करण्याचे आवाहन केले. नाट्यस्पर्धेच्या निमित्त कलेच्या संवर्धनासोबत वीज कर्मचाºयांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळून आपसातील संवाद, सहभाग व सांधिक भावना वाढीस लागते. या स्पर्धेत सहभागी होऊन सर्वांनी दर्जेदार कला सादर केली. रसिकांना मनमुराद आनंद दिला. यातून तुम्ही सर्वजण विजयी ठरले आहात. स्पर्धेत सादर झालेल्या दर्जेदार नाट्य कृतींसाठी बॅकस्टेज आर्टीस्टसह सर्व कलावंताचे त्यांनी विशेष कौतुक केले.

उत्कृष्ट नियोजनाबाबत नागपूर परिमंडलाचे कौतुक त्यांनी यावेळी केले. या नाट्यस्पर्धेचे यजमान तथा नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके म्हनाले की माणसाच्या अंगात जन्मत: ६४ कला असतात त्यात आता ६५ व्या कलेची जोड मिळाली आहे आणि ती आहे कला आणि कलाकारांना दाद देण्याची, ही कला प्रत्येकाने आत्मसात करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी अकोला परिमंडलाचे मुख्यअभियंता सुहास रंगारी, मुख्यालयातील देयक व महसूल विभागाचे परेश भागवत, अमरावती परिमंडलाचे मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी, कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्निल काटकर, छत्रपती संभाजी नगर परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कच्छोट, चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता हरिष गजबे, रत्नागिरी परिमंडलाच्या प्रभारी मुख्य अभियंता कल्पना पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी भरत पवार, या स्पर्धेचे परिक्षक प्रभाकर आंबोने, विनोद तुंबडे आणि मंजुश्री भगत डोंगरे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी तर प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसुदन मराठे यांनी केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *