एसटी बस वेळेवर येत नसल्याने आक्रमक विद्यार्थ्यांनी थेट आगार व्यवस्थापकाच्या दालनात भरवली ‘शाळा’

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : परिवहन महामंडळाच्या एसटी बस वेळेवर येत नसल्याने आक्रमक शालेय विद्यार्थी थेट आगार व्यवस्थापकाच्या दालनात पोहोचले. त्यांच्या दालनातच शाळा भरवली असल्याचे पहावयास मिळाले. तुमसर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रवासाचं एकमेव साधन असलेल्या एसटी बस अनियमित वेळेत गावात येत असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे आंबागड, गायमुख, दावेझरी, रामपूर, ताडगाव येथील आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी शिवसेनेचे विभाग प्रमुख तथा स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित एच मेश्राम यांच्या नेतृत्वात आगार व्यवस्थापकांकडे जाऊन आपला रोष व्यक्त केला. ग्रामीण भागातून शहरात जाण्यासाठी परिवहन महामंडळाच्या एसटी बस हा एकमेव पर्याय शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांसमोर आहे. तुमसर आगाराकडून अनियमित वेळेत एसटी बस गावात येत असून कमी गाड्या सोडल्या जात असल्याने विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

तुमसर तालुक्यातील आंबागड, गायमुख, रामपूर, ताडगाव, दावेझरी या गावातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. त्यासाठी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र मानव विकास बसने यावे लागते. या गाडीची ४० ते ५० विद्यार्थी दररोज वाट पाहत ताटकळत बसतात. त्यांनतर बस आल्यावर त्यामध्ये विद्यार्थ्यांसमवेत इतर प्रवाशी ही बसतात. आधीच बस उशीरा आल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. परिणामी त्रस्त विद्यार्थ्यांनी आगार व्यवस्थापकाकडे आक्रोश व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या तुमसर आगार प्रमुखांसमोर आपल्या समस्यांचा पाढा मांडला. दरम्यान गटशिक्षणाधिकाºयांच्या मध्यस्थीनंतर तसेच एसटी अधिकाºयांच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. एसटी महामंडळाने ग्रामीण प्रवाशांसह विद्यार्थ्यांकरता बसेसची संख्या वाढवण्याकडे लक्ष देण्याची मागणी शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच मेश्राम यांनी केली आहे. यावेळी आंबागड ग्रामपंचायतचे उपसरपंच राजहंस कटरे, परेश चौधरी, प्राची अडमाचे, साहिली निकुळे, दिव्या टेम्भरे, सानिया रहांगडाले, मोनाली बिसने, साक्षी ठाकरे, जान्हवी रहांगडाले, पलक ठाकरे, सुहानी रिनायत, मानसी शरणागत, आराध्या कावळे, हिमानी रहांगडाले, प्रणव टेम्भरे, कोमल चौधरी, मयुरी अडमाचे, हिमानी पारधी, सुप्रिया नेवारे, दामिनी रहांगडाले, वैशाली टेकाम, सुहानी अटराहे, शारदा मांढरे यासह शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *