स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाºया अधिकारी कर्मचाºयांचा पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार

भंडारा : पोलीस कवायत मैदानावर आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य कार्यक्रमानंतर उत्कृष्ट कार्य करणाºया अधिकारी व कर्मचाºयांचा सत्कार पालकमंत्री श्री. गावित यांच्या हस्ते स्वातंत्र्याच्या मुख्य कार्यक्रमानंतर करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी समिर कुर्तकोटी, पोलीस अधिक्षक लोहीत मतानी, उपवनसंरक्षक राहुल गवई यांच्यासह प्रशासनातील सर्व वरीष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जम्मु काश्मीर मोहिमेमध्ये अपंगत्व आलेल्या सेवारत सैनिक विरेंद्र भोजराज अंबुले यांना ताम्रपट धनादेश व शाल श्रीफळ देवून श्री. गावित यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्षारोपण कार्यक्रमात उत्कृष्ट काम केल्याबद्दल वनपाल आर.टी.मेश्राम व वनरक्षक पि.आर आंबुले यांचा सन्मान करण्यात आला. स्वच्छ भारत मिशन या विभागातर्फे पुरुषोत्तम रुखमोडे सरपंच व नरेश शिवणकर, सचिव ग्रामपंचायत वलमाझरी, सौ. शारदा गायधने व विलास खोब्रागडे ग्रामपंचायत बेला प्रशांत भुते व कृष्णा दोनोडे ग्रामपंचायत मोखाडा यांना सन्मानित करण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत उद्योग पुरस्कार प्राप्त कृष्णा उद्योग व बजरंग राईस मिल खडकी यांना सन्मानित करण्यात आले. पोलीस अधीक्षक भंडारा यांच्यामार्फत सौरभ घर- डे व मोहन निखारे, सुरेश उपाध्याय, दिनू मते आणि राजेश बांते यांना सन्मानित करण्यात आले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मार्फत शालेय क्रीडा स्पर्धामध्ये प्राविण्य मिळवणाºया शाळांना प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यात आले. यामध्ये रॉयल पब्लिक स्कूल भंडारा, नूतन कन्या विद्यालय भंडारा, गांधी विद्यालय कोंढा, यांचा समावेश आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *