भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- हातउसने दिलेले १० हजार रुपये परत मागण्यासाठी फोन केला असता शहरातील सिंधी लाईन येथे या असे बोलून पैसे मागितल्यावर १ महिन्यांनी देतो बोलल्यावर घराकडे परत पायदळ जात असलेल्या ६५ वर्षीय वृद्ध इसमाचा पाठलाग करून चाकूहल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना शहरातील सिंधीलाईन चौक जवळ चॉईस मोबाईल दुकानासमोर बुधवारी (ता. २१) रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान घडली. रामभाऊ सोमाजी गि-हेपुंजे वय ६५ वर्ष रा. प्रभाग क्र. ११ तलाव वार्ड, बुरड मोहल्ला लाखनी असे गंभीर जखमीचे नाव आहे तर सोपान उर्फ स्वप्तनील धारस्कर वय ३५ वर्ष रा. बुरड मोहल्ला तलाव वार्ड लाखनी , जीतु आडनाव माहीती नाही अशी लाखनी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. यात रामभाऊ यांच्या उजवे हाताचे कोहनीवर, बाजुवर, खांद्यावर व मानेवर चाकूहल्ला केला. त्यांना घटनास्थळावर उपस्थितांनी लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. प्रकृती अत्यावस्थ असल्याने कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकाºयांनी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठवले असून घटनेची नोंद लाखनी पोलिसांनी केली असून घटनेचा लाखनी पोलीस तपास करीत आहेत.