भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- गोंदिया जिल्हा परिषद शिक्षण विभागात कार्यरत शिक्षिका राजश्री सत्यनारायण अग्रवाल तब्बल ६ वर्षे ११ महिने २५ दिवस गैरहजर राहिल्या. ५ वर्षांपेक्षा अधिक काळ गैरहजर राहणाºया शासकीय कर्मचाºयांना सेवेत पुन्हा रुजू करण्यासाठी शासनाची मंजुरी आवश्यक असते. मात्र, तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकाºयांनी शिक्षिका अग्रवाल यांना मंजुरी न घेताच सेवेत रुजू करून घेतले, असा आरोप करीत वरिष्ठ स्तरावर चौकशी करावी, अशी मागणी युवाओं की आवाज गैरराजकीय संघटनेच्या पदाधिकाºयांनी ९ सप्टेंबर रोजी स्थानिक शासकीय विश्रामगृहात पत्रपरिषदेत केली. जिप हिंदी पूर्व माध्यमिक शाळा तेढवा येथे कार्यरत शिक्षिका राजश्री अग्रवाल कोणतेही कारण न देता ४ जुलै २०१६ ते २९ जून २०२३ या कालावधीत गैरहजर राहिल्या. पत्रपरिषदेत माहिती देताना संघटनेचे पदाधिकारी शासनाने परवानगी दिल्यास अशा कर्मचाºयाला रुजू करून घेतले जाते.
मात्र, येथील प्राथमिकचे तत्कालीन शिक्षणाधिकारी तथा माध्यमिकचे शिक्षणाधिकारी महेंद्र गजभिये यांनी अग्रवाल यांना अनधिकृतरीत्या रुजू करून घेतले. रुजू करून घेताना अनियमितता व नियम डावलल्याचे सकृतदर्शनी निदर्शनास येत असल्याचा अभिप्राय अहवालात चौकशी अधिकाºयांनी दिला आहे. याप्रकरणी शिक्षिका अग्रवाल यांची वरिष्ठ स्तरावर चौकशी करावी, गैरहजर असताना घेतलेले शासकीय वेतन, भत्त्यांची वसुली करून सेवामुक्त करण्यात यावे, तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकाºयांसह कनिष्ठ प्रशासन अधिकारी सौरभ अग्रवाल यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पत्रपरिषदेला अध्यक्ष सचिन रहांगडाले, चंदा सिंगनधुपे, डॉ. मुनेश्वर चिखलोंडे, मोहिनी बोपचे, निशा सादेपाच, अशोक सोनटक्के, सुशीला देशमुख, शीतल पाचे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
शासकीय नियमांचे उल्लंघन नाही
तत्कालीन परिस्थितीनुरूप नियमानुसारच कारवाई केली. शासन निर्णयानुसारच शिक्षिका राजश्री यांना रुजून करून घेतले. शासन निर्णयाचे उल्लंघन झाले नसल्याचे तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी तथा विद्यमान माध्यमिक शिक्षणाधिकारी महेंद्र गजभिये यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले. दुसरीकडे शिक्षिका राजश्री अग्रवाल यांच्या संदभार्तील प्रस्ताव मुख्याधिकाºयांकडे सादर केला. त्यांनी प्रस्तावावर काय टिपणी दिली हे माहीत करून सांगतो, अशी प्रतिक्रिया प्राथमिकचे शिक्षणाधिकारी महामुनी यांनी दिली.