भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : आरोग्य विभागातर्फे सुरक्षित प्रसुती आणि त्यानंतरच्या उपचारांची हमी देण्याचा प्रयत्न नेहमीच केला जातो. गर्भवती मातांचे पोषण आणि आरोग्य चांगले राखण्यासह त्यांच्या बाळंतपणासाठीही शासकीय स्तरावर विविध योजना राबविण्यात येतात. मात्र, अशा योजना केवळ कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार असून, प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याचेच चित्र आहे. आज भंडाºयातील घटनेने सामान्यांचे काळीज पिळवटून निघाले आहे. रुग्णालयात डॉक्टर नसणे, स्वच्छतेचा अभाव, औषधेउपकरणांची कमतरता आणि परिणामी जीव गमवायची वेळ सामान्यांवर येते. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलेल्या महिलेचा आणि तिच्या गर्भातील बाळाचा काल मध्यरात्रीच्या सुमारास मृत्यू झाला. भंडाºयाच्या लाखनी तालुक्यातील लोहारा खराशी गावातील अश्विनी मेश्राम असं मृत महिलेचे नाव आहे.
अश्विनीच्या कुटुंबियांनी तिला काल जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केले. प्रसुतीदरम्यान तिचा मृत्यू झाला. यावेळी महिलेला मुलगा झाला असूनतो मृत असल्याचे डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले त्यानंतर, जिल्हा सामान्य रुग्णालयातून महिलेचे शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले बाळाच्या दफनविधीसाठी शवविच्छेदन केलेल्या महिलेचा मृतदेह नातेवाईकांनी उघडला. मात्र, त्यात बाळ दिसलेच नाही. त्यावरून जिल्हा सामान्य रुग्णालयातून चुकीची माहिती दिल्याचा संताप व्यक्त करत संताप व्यक्त केला. तसेच, मृत महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार न करता याची चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी स्मशानभूमीत ठिय्या आंदोलन सुरू केले. दरम्यान, वैद्यकीय अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेला प्रसुतीसाठी दाखल करण्यास उशीर झाला होता. त्यातच, तिचा रक्तदाब वाढल्याने मृत्यू झाला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती लोहारा खारशी येथे पाठविल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे.