भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्र यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केलेल्या कायार्साठी वर्ल्ड अॅग्रीकल्चर फोरमच्या वतीने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसआणि अजित पवार यांचा सन्मान करण्यात येणार आहे. एन सी पी ए येथे २० देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय बांबू दिवसाचे औचित्य साधत दि. १८ रोजी हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.