भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त लायन्स क्लब भंडारातर्फे आज दिनांक २ आॅक्टोबर २०२४ रोजी सकाळी ६ वा. गांधी चौक भंडारा येथे भव्य मॅरेथॉन ,वॉकथॉन (चालण्याची) स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा मॅरेथॉन पुरुषासाठी १४ किमी व महिलांसाठी ०५ किमी तर वॉकथॉन स्पर्धा पुरुषासाठी ०३ किमी व महिलांसाठी ०२ किमी अशी विविध वयोगटानुसार घेण्यात आली. या स्पर्धांमध्ये शहरातील व तालुक्यातील हजारो स्पर्धकांनी सहभाग दर्शविला होता. भंडारा जिल्हाधिकारी संजय कोलते व पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला.
या स्पर्धेमध्ये निलाराम बावणे, अजित ऊके, रोहित ढबाले, तेजस्विनी लांबकाने, उत्कर्षा बोरकर, शितल आंबेकर, दिनेश मारबते, सुशील शिंदे, प्रमिला लांबकाणे, मेघा हलमारे, निकिता गजभिये, आश्विन सेलोकर, विवेक चटप, सिद्धार्थ हुमणे, सुभाष चिमणकर, नरेंद्र लांबकाने, पियुष महाकाळकर, सोमेश्वर कोरे, राजकुमार बावनकर, अविनाश गायधने, दीपक कांबळे, संस्कार केझरकर, आर्यन कनोजे यांनी विविध गटात क्रमांक पटकाविले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता स्वराज फाउंडेशन, नगरपरिषद भंडारा, एकविरा क्रीडा संघटना भंडारा, युनिव्हर्सल स्पोर्ट्स क्लब भंडारा, वाईस आॅफ मीडिया भंडारा, वैनगंगा स्पोर्टिंग क्लब भंडारा, बार असोसिएशन भंडारा, रोटरी क्लब भंडारा, शीतला माता मंदिर योग ग्रुप समिती भंडारा, योग विद्याधाम केंद्र भंडारा, कटअ भंडारा, बायसिकल ग्रुप भंडारा, संस्कार समिती भंडारा, जाणता राजा स्पोर्ट्स अकॅडमी भंडारा, स्पोर्ट डेव्हलपमेंट फाउंडेशन भंडारा, ग्रीन हेरीटेज सोशल फाऊंडेशन यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याप्रसंगी धनंजय दलाल, प्रकाश बाळबुधे, इंमा काबरा, सुमंत देशपांडे, डॉ. भरत लांजेवार, डॉ. योगेश जिभकाटे, नदीम खान, रुपेश टांगले, सुर्यकांत इलमे व आदी उपस्थित होते.