भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यात गुरुवार दि. ३ आॅक्टोबर २०२४ रोजी सायंकाळच्या ४ वाजताच्या सुमारास वादळी वाºयासह पावसाने उभा असलेला धान पीक जमीनदोस्त केला तर कापलेला धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पावसामुळे बळीराजाच्या हाता तोंडाशी आलेला घास अस्मानी संकटाने हीराहून घेतला. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून शेतकºयांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणीचे निवेदन नितीन छोटेलाल लिल्हारे यांच्या नेतृत्वाखाली मोहाडी तहसीलदार सुरेश वाघचौरे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले. मोहाडी तालुक्यातील सालई खुर्द, सिहरी, उसर्रा, पालडोंगरी, धोप, ताडगाव, डोंगरगाव, टांगा सह संपूर्ण मोहाडी तालुक्यात अचानक वादळी वाºयासह पावसाने चांगलेच झोडपले. या पावसामुळे शेतकºयांचे धान पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा अस्मानी संकटात सापडला असून अजून पर्यत शासन स्तरावरून मदतीचे कुठेच आदेश पारीत झाले नाही. आदीच शेतकºयांचे धान पिका वरील रोगराईने शेतकरी त्रस्त झाला असून अशातच आलेल्या पावसाने शेतकºयांचे पिके संकटात सापडली त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
दिवाळी पूर्वी हलक्या वाणाचा धान कापणीला आला असताना या वादळामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी पाऊस समाधानकारक झाल्यामुळे धान पीक चांगले आले होते, मात्र तालुक्यात अचानक झालेल्या पावसाने धान व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकºयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. निसर्गाने पुन्हा झोडपून काढले असून डोळ्यासमोर धान पीक खराब होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर शासनाणे नुकसान भरपाई घोषित करावी. शेतकरी आता अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून शेतकºयांना आर्थिक मदत देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले. यावेळी नितीन छोटेलाल लिल्हारे, अशोक मूटकुरे, लालचंद ठाकरे, भारत पटले, शिवदास पटले, मंसाराम लिल्हारे, शिवदास दमाहे, इमरीत ठाकरे, अशोक पटले, राजहंस लिल्हारे, सुरेंद्र तूरकर, गुलाब तुरकर, गुलाब पटले, राकेश नारनवरे, झनकलाल दमाहे, परसराम अटराहे, देवदास बघेले, गेंदलाल अटराहे, अंकित अटराहे, आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.