‘इडी’ सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फ निषेध

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आज दिनांक २३ डिसेंबर २०२२ रोजी भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना तहसीलदार भंडारा यांच्या मार्फत आ. जयंत पाटील यांचे अधिवेशन काळातील निलंबन मागे घेण्याबाबत निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष व गटनेते जयंतराव पाटील यांच्यावर नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशन कालावधीपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली. पाटील यांच्यावर नागपूर व मुंबई विधिमंडळ परिसरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. शिंदे व भाजप सरकार अधिवेशन काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांचा आवाज दाबन्याचा प्रयत्न करत आहे तसेच विरोधी पक्षाच्या माननिय सदस्यांना अधिवेशन काळामध्ये बोलु न देण्याचा प्रयत्न करीत आहे. सदर शिंदे व भाजप सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फ निषेध करून खोके सरकार विरुध्द घोषणा देण्यात आल्या. सदर अधिवेशन काळातील निलंबन लवकरात लवकर मागे घेण्यात यावे अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तर्फे तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या वेळी निवेदनातुन देण्यात आला.

निवेदन देतांना प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष नानाभाऊ पंचबुधे, प्रदेश सचिव अ‍ॅड जयंत वैरागडे, महेंद्र गडकरी, विनयमोहन पशीने, बाबुराव बागडे, रत्नमाला चेटूले, नरेंद्र झंझाड, यशवंत सोनकुसरे, आशा डोरले, आरजु मेश्राम, हेमंत महाकाळकर, अश्विन बांगडकर, किर्ती गणविर, मंजुषा बुरडे, उमेश ठाकरे, प्रदिप सुखदेवे, राजु पटेल, शेखर गभने, मधुकर चौधरी, राजु साठवने, रुपेश खवास, मौसमसिंह ठाकुर, महेंद्र बारापात्रे, गणेश बाणेबार, विष्णू कढिखाये, मयुरेश पंचबुधे, निशांत बुरडे, अमन मेश्राम, संजय वरगंटीवार, किर्ती कुंभरे, संगीता चव्हाण, ओमप्रकाश चव्हाण, रवि लक्षणे, रजश्री राखडे, सारिका साठवने, वंदना साठवने, वर्षा आंबाडारे, सोनल पवनकर, रीना शेंडे, हर्षीला कराडे, पूर्णा गजभिये, प्रभाकर बोदेले, संतोष राजगिरे, नरेश येवले, विघा साखरे, किरण साखरे तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.