वीज पडून शेतकºयाचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : रोवणीपूर्वक चिखलासाठी पाणी करण्यासाठी गेलेल्या एका शेतकºयावर वीज पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना १९ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील खैरना शेतशिवरात घडली . बाबुराव रामचंद्र मेश्राम (४५) रा . दोनाड असे मृतकाचे नाव आहे . प्राप्त माहितीनुसार घटनेतील शेतकरी खैरना येथील गोपाल मेंढे नामक शेतकºयांची मालकीची दीड एकर शेती ठेक्याने केली होती . या शेतात उन्हाळी धान पुरवणीसाठी शेतात पाणी उपलब्ध होण्यासाठी घटनेच्या दिवशी संध्याकाळच्या सुमारास शेतावर गेला होता .

दरम्यान मागील दोन दिवसापासून विविध भागात ढगाळ वातावरण दिसून येत असताना घटनेच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास अचानक मेघगर्जना सह विजेचा कडकडा सुरू झाला होता अशातच बाबुराव शेतावर पाणी करायला गेलेल्या शेतकºयाच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला . दरम्यान सायंकाळी शेतावर गेलेल्या मूर्तक रात्री उशिरा घरी परत नाही आल्याने कुटुंबाने गावात शोधा शोध करून तब्बल तीन तास नंतर रात्री ९ वाजताच्या सुमारास शेत शिवार गाठले असता संबंधित घटनेची शेतकरी मृत अवस्थेत आढळून आला . घटनेची माहिती गावकºयांना होताच संबंधित घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती लाखांदूर पोलीस स्टेशनला देण्यात आली या माहितीवरून लाखांदूरचे पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार वासनिक, ओमकार सपाटे ,चालक भूपेंद्र बावनकर यासह अन्य पोलीस कर्मचाºयाांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करीत मृतदेह शविच्छेदनासाठी पाठवण्यात आले .

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.